Omicron Second Death sakal
देश

देशात ओमिक्रॉनचा दुसरा बळी? राजस्थानमध्ये ७३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : सध्या देशात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या (India Omicron Cases) झपाट्याने वाढत आहे. एकाच महिन्यात ओमिक्रॉनचे रुग्ण १२७० वर पोहोचले आहेत. त्यातच राजस्थानमध्ये ओमिक्रॉनमधून बरं झाल्यानंतर एका व्यक्तीचा आज मृत्यू (India Omicron Death Toll) झाला आहे. राजस्थानच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

गेल्या १५ डिसेंबरला ७३ वर्षीय व्यक्तीचा ओमिक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानुसार त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तो बरा देखील झाला. त्याची दोनवेळा चाचणी केली असता तो निगेटिव्ह आला. पण, त्याचा आज मृत्यू झाला आहे. तो ओमिक्रॉनमधून बरा झाल्यावर त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा पोस्ट कोविड मृत्यू आहे, असं उदयपूर आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश खराडी यांनी सांगितले.

दरम्यान, भारतातील ओमिक्रॉनच्या पहिल्या बळीची नोंद महाराष्ट्रात झाली. पिंपरी चिंचवडमधील ५३ वर्षीय व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झाली होती हे देखील स्पष्ट झाले. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असून पहिल्या बळीमुळे चिंता देखील वाढली आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण -

  1. महाराष्ट्र - ४५०

  2. दिल्ली - ३२०

  3. केरळ - १०९

  4. गुजरात - ९७

  5. राजस्थान - ६९

  6. तेलंगणा - ६२

  7. कर्नाटक - ३४

  8. आंध्र प्रदेश -१६

  9. हरियाणा - १४

  10. ओडिशा - १४

  11. पश्चिम बंगाल - ११

  12. मध्य प्रदेश - ०९

  13. उत्तराखंड - ०४

  14. चंदीगढ - ०३

  15. जम्मू-काश्मीर - ०३

  16. अंदमान-निकोबार - ०२

  17. उत्तर प्रदेश - ०२

गोवा, हिमालच प्रदेश, लडाख, मणिपूर, पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: रेल्वे प्रशासनाचा अ‍ॅक्शन मोड! लोकलमध्ये तळीरामांवर कठोर कारवाई, 'ड्रंक अँड ट्रॅव्हल 'ची विशेष मोहीम

Mumbai News: जुहूमध्ये नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू, मॉन्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह; निष्काळजीवर संताप

Pune Sports: पुण्यातील खेळाडूंसाठी आनंदाची बातमी! महापालिकेची क्रीडा शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू, चार वर्षांचा खंड संपला..

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

SCROLL FOR NEXT