narendra modi 
देश

75 व्या स्वातंत्र्यानिमित्त 75 'वंदे भारत' रेल्वेची घोषणा

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 व्या स्वातंत्र्यानिमित्त देशाला संबोधित करत आहेत. भारतीय रेल्वे नव्या रुपात समोर येत आहे. गतीने आधुनिक रुप घेत आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 आठवड्यात 75 वंदे भारत रेल्वे देशाच्या प्रत्येक भागाला जोडतील, असं मोदी म्हणाले आहेत. देशात हवाई सेवा वाढत आहेत. अनेत भागात विमानसेवा पोहोचत आहे. कनेक्टिविटी वाढत आहे, असंही ते म्हणाले.

लवकरच ईशान्य भारतातील सर्व राजधान्यांना रेल्वेने जोडले जाणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. स्थायी शांततेसाठी प्रयत्न केले जात आहेत. ईशान्य भारतात खुप क्षमता आहे. त्याला मुख्य प्रवाहात जोडलं जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विकास दिसून येत आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे. लडाखमध्ये सिंद्धू सेंट्रर युनिव्हर्सिटी सर्वांचे लक्ष वेधते आहे, असंही मोदी म्हणाले.

भारत सहकारवादावर भर देत आहे. आपल्या परंपरेला ते अनुकूल आहे. 8 कोटींपेक्षा अधिक महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या वस्तू देशभरात आणि जगभरात पोहोचवण्यासाठी मदत होईल, असं मोदी यावेळी म्हणाले.

भारत एनर्जीवर दुसऱ्यावर अवलंबून आहे. आत्मनिर्भर भारतासाठी हा अडथळा आहे. त्यामुळे एनर्जीमध्ये आत्मनिर्भर होणे ही काळाजी गरज आहे. त्यामुळे इतर इंधन प्रकाराचा वापर करण्याचा संकल्प करुया. इकेल्ट्रिक वाहनांच्या वापराकडे आपण पाऊल टाकलं आहे. 2030 पर्यंत सर्व रेल्वे इलेक्ट्रिक असतील. जी-20 देशांमध्ये भारत क्लायमेंट गोल पूर्ण करण्यात पुढे जात आहे. ग्नीन हायड्रोज मिशनची घोषणा करत असल्याचं मोदी म्हणाले. ग्रीन ग्रोथ ते ग्रीन जॉब तरुणांना मिळतील, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT