8 Dead After Fire Breaks Out At Covid 19 Hospital In Ahmedabad 
देश

कोविड रुग्णालयात आग, आठ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून दखल

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : कोविड रुग्णालयात आग लागल्याची घटना अहमदाबाद शहरतील नवरंगपुर या भागात घडली असून या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. आज (ता. ०६) सकाळी लागलेल्या या आगीत अनेक जण गंभीर भाजले असल्याचेही सांगण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांवरच उपचार केले जात असणाऱ्या श्रेय नावाच्या रुग्णालयात ही आग लागली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ही घटना घडल्यानंतर रुग्णालयातील ४० जणांना सुरक्षित बाहेर काढले असून दुसऱ्या रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत पावलेल्या रुग्णांना पंतप्रधान सहायता निधीतून दोन-दोन लाख रुपये अर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांनाही प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचे घोषित केले आहे.

देशात दोन दिवसांत १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण; आकडा १९ लाख पार

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना धीर देण्याच्या प्रयत्न केला आहे. तसेच, जखमी असलेले लोक लवकरच बरे होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, पंतप्रधानांनी सांगितले आहे की, या घटनेबाबत त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अहमदाबादचे महापौर यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासन पिडित लोकांना संपूर्ण मदत करेल असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव संगीत सिंह या प्रकरणाचा पुढील तपास करत असून तीन दिवसांत त्यांना या घटनेचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यास सांगितले आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये एकूण ६५ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील टॉप फाईव्ह कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत गुजरात एक आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत एकूण ४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT