river sakal
देश

ब्रह्मपुत्रा नदीतील बोट दुर्घटनेतील ८४ जणांना वाचविले

अद्याप दोन जण बेपत्ता, मुख्यमंत्री सरमा यांना घेतला आढावा

सकाळ वृत्तसेवा

जोरहाट/गुवाहाटी : ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील ८७ पैकी ८४ जणांचा बचाव करण्यात यश आले आहे. दोन जण अजूनही बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

आसाममधील जोरहाट जिल्ह्यात निमती घाटाजवळ हा अपघात काल सायंकाळी घडला. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ‘माँ कमला’ ही खासगी बोट माजुली येथे जात होती. त्याचवेळी माजुलीहून येणाऱ्या ‘त्रिपकाई’ या सरकारी फेरीबोटीशी तिची निमती घाट येथे धडक बसली. धडकेनंतर ‘माँ कमला’ बोट पाण्यात उलटून बुडाली.

बोटीवर १२० हून अधिक लोक होते. शोधमोहिमेदरम्यान एका महिलेचा मृतदेह सापडला. ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर उलटलेल्या बोटीचे अवशेष राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या (एसडीआरएफ) पाणबुड्यांना सापडले. या बोटीचा तळ कापला गेलेला होता. पण बोटीत एकही प्रवासी आढळला नाही, अशी माहिती जोरहाटचे उपायुक्त अशोक बरमन यांनी दिली. ‘‘बोट दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. जोरहाट आणि माजुली जिल्ह्यांमधील ८४ जणांचा बचाव केला आहे,’’ असे ते म्हणाले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी आज घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला. या प्रकरणी फौजदारी खटला दाखल करण्याचा आदेश त्यांनी पोलिसांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update : बांधकाम नकाशा हीच अकृषिक परवानगी - जमीन महसूल कायद्यात सुधारणा

Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT