देश

कर्मचाऱ्यांनी नजरचुकीने लावलं कुलूप; 18 तास बँकेतच अडकले आजोबा

सकाळ डिजिटल टीम

हैद्राबाद : हैद्राबादमध्ये 84 वर्षीय वृद्धाला बँकेच्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा भोवला आहे. या वृद्धाला तब्बल 18 तास एका बँकेच्या लॉकरमध्ये कोंडून रहावं लागलं आहे. जेंव्हा पोलिसांकडून शोध घेण्यात आला तेंव्हा त्यांची सुटका झाली आहे. तब्बल 18 तासांनंतर त्यांची सुटका झाली असून लॉकर उघडल्यानंतर हे वृद्ध बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेले आढळले. त्यानंतर घाई गडबडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. (Hydrabad News)

ही घटना हैद्राबादमधील जुबली हिल्स परिसरामधील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये घडली आहे. सायंकाळी साधारण चार वाजून 20 मिनिटांनी हे आजोबा काही कारणास्तव बँकेत गेले होते. त्यांनी त्याठिकाणी आपलं लॉकर उघडलं. यावेळी बँकेच्या स्टाफने त्यांना पाहिलंच नव्हतं आणि ते त्यानंतर कुलूप लावून निघून गेले. त्यामुळे हे आजोबा आतच अडकून पडले.

लॉकरमध्ये बेशुद्धावस्थेत पडले आजोबा

सायंकाळी उशीरापर्यंत जेंव्हा हे आजोबा घरी गेलेच नाहीत तेंव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला. जेंव्हा त्यांचा शोधच लागला नाही तेंव्हा त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी जुबली हिल्स चेकपोस्ट परिसरामध्ये सीसीटीव्ह चेक केला आणि त्यांना हे आजोबा बँकेत गेल्याचं कळालं. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता जेंव्हा लॉकर रुम उघडण्यात आली तेंव्हा हे आजोबा जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. हे आजोबा मधुमेहाचे रुग्ण आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आजोबा मधुमेही आहेत. त्यामुळे ते सापडताच त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT