Election Esakal
देश

Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात कारमध्ये सापडले ८८ लाख रुपये

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी जप्त केली रोकड

सकाळ डिजिटल टीम

एका कारमध्ये लोखंडी पेटीत रोख रक्कम सापडली असून, या रकमेबाबत, रक्कम घेऊन जाणाऱ्याबाबत, वाहनाबाबत व सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कार व ८८ लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी चौकशीसाठी जप्त केली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात असलेल्या चेक पोस्टपैकी अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर चेकपोस्टवर ही घटना घडली. अक्कलकोट दक्षिण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत.

तालुक्यातील तोळणूर गावातील चेकपोस्टवर पोलिस अंमलदार पोलिस हेडकॉन्स्टेबल पांढरे यांनी वाहनांची तपासणी करीत असताना कारला (एमएच १३- सीयू ७५४५) थांबवून त्याची तपासणी केली असता त्या वाहनातील डिकीमध्ये एका लोखंडी पेटीत रोख रक्कम असल्याचे आढळले. त्यांच्याकडे या रोख रकमेबाबत व वाहन आणि सुरक्षा गार्डबाबत चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

तसेच सदरची कार ही अधिकृत रोख रक्कम वाहतुकीसाठी असल्याबाबत कोणतीही कागदपत्रे न दाखविल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक महेश स्वामी यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी केली.

रोख रक्कम ८८ लाख, वाहन व सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकाबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ही रक्कम कारसह अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात आणून दोन पंचांसमक्ष जप्त करून पेटी सीलबंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या रोख रकमेबाबत योग्य ती चौकशी होण्याकरिता आयकर विभाग, सोलापूर यांना पोलिसांनी कळविले आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश स्वामी, हेडकॉन्स्टेबल पांढरे, अजय भोसले तसेच पोलिस मुख्यालय यांच्याकडील पोलिस कॉन्स्टेबल घोडके यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Crime: लॅबमध्ये बोलवलं; संधी मिळताच जवळ ओढून चुंबन घेतलं, नंतर...; शाळेतच महिला शिक्षिकेसोबत दुसऱ्या शिक्षकाचं विकृत कृत्य

DGCA उपसंचालकांना लाच प्रकरणात अटक, ड्रोन आयातीसाठी मागितले होते २.५ लाख

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

SCROLL FOR NEXT