Shamanur Shivashankarappa esakal
देश

Karnataka Election : काँग्रेसनं 91 वर्षाच्या वयस्कर उमेदवाराला दिलं तिकीट; शिवशंकरप्पा म्हणाले, मी तगडा घोडा..

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झालीये.

सकाळ डिजिटल टीम

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जगदीश शेट्टर यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेण्याची जबाबदारी पक्षानं त्यांच्यावर सोपवली होती.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झालीये. आज 20 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

मात्र, या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, काँग्रेसनं दिलेल्या उमेदवाराचं वय तब्बल 91 वर्ष आहे. ते कर्नाटकचे सर्वात जुने उमेदवार आहेत.

सध्या ते काँग्रेसचे विद्यमान आमदार असून यावेळीही ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कर्नाटकातील सर्वात वयोवृद्ध उमेदवाराचं नाव आहे शामनुर शिवशंकरप्पा (Shamanur Shivashankarappa). वयाच्या 91 व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या या आमदाराला अजूनही आपल्या विजयाची खात्री आहे.

शिवशंकरप्पा हे पाच वेळा आमदार आणि माजी लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी दावणगिरी दक्षिणमधून निवडणूक लढवली आहे. या वयात काँग्रेसनं त्यांना तिकीट कसं दिलं? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 'शर्यतीसाठी नेहमीच तगड्या घोड्याची निवड केली जाते. मीही असाच घोडा आहे, त्यामुळं ही निवडणूक मी सर्वात मोठ्या फरकानं जिंकणार आहे.'

कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक होत आहेत. या निवडणुकीत शिवशंकरप्पांची मुख्य लढत दावणगिरीचे माजी नगराध्यक्ष अजय कुमार यांच्याशी आहे. शिवशंकरप्पांनी उमेदवारी अर्ज भरताना 312.75 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

शेट्टर यांना काँग्रेसमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जगदीश शेट्टर यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेण्याची जबाबदारी पक्षानं त्यांच्यावर सोपवली होती. यावरूनच आपल्या लक्षात येईल की, शिवशंकरप्पा काँग्रेससाठी किती महत्वाचे नेते आहेत. भाजपनं शेट्टर यांना आगामी निवडणूक लढवण्यासाठी तिकीट न दिल्यामुळं त्यांनी पक्ष सोडला आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसनं शिवशंकरप्पा यांचे पुत्र आणि माजी मंत्री एसएस मल्लिकार्जुन यांना दावणगिरी उत्तरमधून उमेदवारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT