A 2 year old boy playing with a 10 feet python 
देश

Video : काय पोरगं हाय! 10 फुट अजगरासोबत खेळतोय २ वर्षाचा मुलगा

व्हिडिओ पाहून चुकेल काळाजाचा ठोका

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video On Social Media) होत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा एका भल्या मोठ्या अजगरासोबत (Python Toddler Video) बिनधास्तपणे खेळत आहे. हा व्हिडिओ पाहताच तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकतो. व्हिडिओमध्ये छोटा मुलगा महाकाय अजगाराचा फणा पकडून त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे. (Toddler Playing with Python Video)

व्हिडिओ अत्यंत आश्चर्यकारक आहे. व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शननुसार, हा व्हिडिओ इंडोनेशियातील (Indonesia News) आहे. ३० सेकंदाच्या क्लिपमध्ये, लहान मुलगा अजगरासोबत खेळत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की, जर त्या अजगराने अचानक हल्ला केला तर त्या मुलाचे काय होईल?

व्हिडिओ पाहून तुम्हाला बसेल धक्का

अर्ध्या मिनिटाच्या व्हिडिओमध्ये घराच्या बाहेर २ वर्षाचा मुलगा एका महाकाय अजगरासोबत खेळताना दिसत आहे. साधारण १० फुट लांब अजगर या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ पाहून कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो पण, तो मुलगा न घाबरता, बिनधास्तपणे खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अजगर त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण तो मुलगा त्याच्या तावडीतून सहज बाहेर पडतो आणि त्याचा फणा पकडताना दिसतो.

लोकोंनी दिल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया

हा भयानक व्हिडिओ nature27_12 या इंन्स्टाग्राम अकांउटवर शेअर केले आहे. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काही वेळातच व्हायरल झाला होता. लोक सतत याबाबत आपल्या प्रतिक्रिया देत आहे. यूजर्स व्हिडिओ शूट करणाऱ्यावर टिका करत आहे. एक यूजरने कॉमेंट केले आहे की, ''किती गैरजबाबदारपणा आहे हा''. लहान मुलाला हटविण्याऐवजी व्हिडीओ शूट करत आहे. ''आई- वडिलांचा मुर्खपणा म्हणायचा नाही तर अजून काय, आपल्या मुलाला मरण्यासाठी सोडून दिले, त्यांना त्याची गरज नाही.'' अशी प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून संतप्त झालेल्या युजरने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT