A 24 year old IT professional was chained slashed and burned alive by her childhood friend on her birthday 
देश

वाढदिवसाला सरप्राईज देतो म्हणून बोलावलं; हात-पाय बांधून IT प्रोफेशनल मैत्रिणीला जिवंत जाळलं

तमिळनाडूच्या चेन्नईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय आयटी प्रोफेशनल मुलीचे हात-पाय बांधून जीवंत जाळण्यात आले आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- तमिळनाडूच्या चेन्नईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर प्रोफेशनल मुलीचे हात-पाय बांधून जीवंत जाळण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुलीच्या वाढदिवशीच हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या मित्राला अटक केली आहे.(A 24 year old IT professional was chained slashed and burned alive by her childhood friend on her birthday in tamilnadu)

आरोपी हा मुलीचा मित्र असून दोघेही आयटी प्रोफेशनल आहेत. पीडित मुलगी नंदीनी हिचे पाय आणि हात बांधण्यात आले. त्यानंतर तिच्या मानेवर ब्लेडने वार करण्यात आले. त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आले. वेत्रीमारन उर्फ पंडी महेश्वरी असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केलीये. त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. माहितीनुसार, वेत्रीमारन याने नंदिनीसोबत लग्न करता यावे यासाठी लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी कथितरित्या वेत्रीमारनकडे दुर्लक्ष करु लागली होती. शिवाय तिची इतर मित्रासोबतची जवळीक वाढली होती. त्यामुळे वेत्रीमारन हा संतापला होता. वेत्रीमारन याने वाढदिवसाला सरप्राईज देण्याच्या हेतूने नंदिनीच्या डोळ्यावर पट्टी बांधून एका अज्ञात ठिकाणी नेले. त्याच ठिकाणी वेत्रीमारन याने नंदिनीचा घात केला.

स्थानिकांना नंदिनी अर्ध्या जळालेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. नंदिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी आणि वेत्रीमारन हे मुळचे मदुराईचे असून त्यांनी १० वी पर्यंत एकत्र शिक्षण घेतलं आहे. दोघेही ८ महिन्यांपासून थोराईपक्कम येथील एका आयटी कंपनीत काम करत होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Archery World Championship 2025 : भारतीय महिला तिरंदाजांचा ब्राँझपदकासाठी लढा; दक्षिण कोरियाशी लढत

भरदिवसा घरफोडी! 'वहागावात साडेचार तोळे दागिन्‍यांसह ३५ हजारांची रोकड लंपास'; वाई तालुक्यात भीतीचे वातावरण

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Asia Cup 2025 : सामना अमिरातीबरोबर, पण तयारी पाकविरुद्धची; आशिया चषक स्पर्धेत आजपासून भारताची मोहिम

SCROLL FOR NEXT