Bangladeshi teen nabbed while sneaking into India to buy chocolate सकाळ डिजिटल टीम
देश

चॉकलेट खाण्यासाठी बांग्लादेशी मुलगा बॉर्डर पार करुन यायचा भारतात

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे इमाम हुसेन पहिल्यांदा भारतात आला नाही तर चौकशीदरम्यान आपण दररोज भारतात ये-जा करत असल्याचे त्याने कबूल केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

त्रिपुराच्या (Tripura) सिपाहिजाला (Sipahijala) जिल्ह्यात अशीच एक अविश्वसनीय घटना घडली. येथे लष्कराच्या जवानांनी एका बांगलादेशी (Bangladesh) अल्पवयीन मुलाला पकडले आहे. हा मुलगा वैध कागदपत्रांशिवाय भारतात आला. जेव्हा त्याची विचारपूस करण्यात आली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली, ज्याच्यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही.

लष्कराच्या चौकशीदरम्यान मुलाने भारतात येण्याचे कारण सांगितले जे अतिशय विचित्र होते. या मुलाने सांगितले की, आपल्या आवडीचे चॉकलेट (Chocolate) खाण्यासाठी तो रोज एक छोटी नदी पोहून त्यानंतर बॉर्डर ओलांडून गैरप्रकारे भारतात प्रवेश करायचा. इमाम हुसेन असे या मुलाचे नाव आहे. (a Bangladeshi teen arrested for crossing into India to buy chocolate)

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे इमाम हुसेन पहिल्यांदा भारतात आला नाही तर चौकशीदरम्यान आपण दररोज भारतात ये-जा करत असल्याचे त्याने कबूल केले आहे. भारतामधून आपल्या आवडीचे हे चॉकलेट विकत घेऊन तो परत जायचा. इमाम हुसेन तारांच्या मध्ये असलेल्या गॅपमधून निसटून एका नदीत पोहत भारतात यायचा. त्रिपुरातील कलामचौरा गावातून तो आपल्या आवडीचे चॉकलेट घ्यायचा.

असाच तो आला असता स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात दिले. त्याला न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT