देश

तरुणीचे प्राण वाचवण्यासाठी त्याने मारली ट्रेनसमोर उडी

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

सकाळ वृत्तसेवा

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

आपल्या आजुबाजूला बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. अशावेळी काहीजण मदत करतात तर काहीजण पाहून न पाहिल्यासारखे करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. हा व्हिडिओ मध्यप्रदेशमधील भोपाळ (Bhopal) येथील आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी 37 वर्षीय मुस्लिम व्यक्तीने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रेल्वेसमोर उडी मारली आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ (Video) प्रचंड व्हायरल होतोय.

स्नेहा गौर या मुलीला मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहम्मद महबूब आहे. ही घटना पाच फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता भोपाळमधील बारखेडी येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा ही मुलगी हातात सामान घेऊन रेल्वे ट्रॅक ओलांडून जात होती. त्याच वेळी समोरुन मालगाडी आली, मालगाडी येत असल्याचे पाहताच ती खूप घाबरुन जाऊन त्याच रुळावर घसरुन पडते.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद महबूब हे सुतार काम करतात, त्या घटनेवेळी ते नमाज अदा करुन निघाले होते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मदत मिळावी यासाठी हाक मारताना मोहम्मद यांनी कोणत्याही गोष्टींचा विचार न करता स्नेहाचा जीव वाचवण्यासाठी ट्रॅकवर उडी मारली. त्यावेळी तिचा जीव वाचवण्यासाठी तो व्यक्ती तिच्यादिशेने जाऊन त्या मुलीला रेल्वे त्यांच्यावरुन जात नाही तो पर्यंत डोक वर करु दिलेल नसल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, त्या मुलीला मदतीचा हात पुढे केल्यामुळे मोहम्मद यांचा सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT