Viral Video of Girl helping Dog Esakal
देश

Video: चिमुकलीकडून थोडं शिका! हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा पाहाच

Viral Video: एका चिमुकलीचा फटाक्यांच्या आवाजाने घाबरलेल्या कुत्र्याला (Dog) मदत करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे

सकाळ डिजिटल टीम

सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे. रोज काहीना काही ट्रेंडींगमध्ये असते. मनोरंजन, फॅशन, कला, शिक्षण, पर्यटन अशा विविध प्रकारच्या उपयुक्त गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर सहजतेने पाहता येतात. परंतु त्याचवेळी दुसऱ्या बाजूला उथळ गोष्टींचीही कमी नाही. एकीकडे सोशल मीडियावर अश्लीलता आणि दहशत निर्माण करणाऱ्या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतानाच एका चिमुलकीचा हृदयाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. (A video of a Girl child helping a frightened dog with the sound of firecrackers has gone viral on social media)

व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्याला एका रस्त्याच्या कडेला बसलेला काळ्या रंगाचा कुत्रा (Dog) दिसतो. गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान केलेली एक गोंडस चिमुकली (Girl Child) तिथे येते. ती त्या कुत्र्याला मायेने गोंजारत असते. कुत्राही शांतपणे बसलेला असतो. दरम्यान अचानक तिथे फटाक्यांचा (Fireworks) आवाज सुरु होतो आणि कुत्रा बिचकतो. दरम्यान कुत्रा फटाक्यांच्या आवाजाने घाबरलाय हे लक्षात येताच चिमुकली क्षणाचाही विलंब न करता कुत्र्याच्या जवळ जाऊन त्याच्या दोन्ही कानांवर हात ठेवते, जेणेकरून त्याला फटाक्यांचा आवाज ऐकू जाऊ नये आणि तो घाबरू नये.

व्हायरल व्हिडीओमधील चिमुकल्याच्या या साध्या कृतीने तिने लोकांची मने जिंकली आहेत. इवल्याशा वयातील तिची संवेदनशीलता आणि हजरजबाबीपणामुळे नेटकरी प्रभावित झाले आहेत. ‘Yog’ या ट्विटर (Twitter) हॅण्डलवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT