Aadhaar card, ration card linking deadline extended till September 
देश

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रेशन कार्डच्या नियमात केंद्र सरकारनं बदल केला आहे. याचा जवळपास ८० कोटी लोकांना फायदा होणार आहे. रेशन कार्डधारकांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. रेशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार क्रमांकाला जोडण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल (ता. ११) सोमवारी सरकारनं यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. तसंच आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचंही सरकारने सांगितले आहे. रेशन कार्डाला आधार क्रमांक न जोडल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येण्याच्या बातमीवर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यावेळी ही बाब स्पष्ट करण्यात आली. सरकारनं आता आधार क्रमांक रेशन कार्डाला जोडण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, अद्यापही कोट्यवधी लोकांनी आपला आधार कार्ड क्रमांक रेशन कार्डाला जोडलेला नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या अधिसूचनेच्या आधारे सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना रेशनकार्ड आधार क्रमांकाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

Coronavirus : ब्रिटनमध्ये वाढवला 'या' तारखेपर्यंत लॉकडाऊन

जोपर्यंत सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट सूचना देत नाही तोपर्यंत त्याच्या वाट्याचे रेशन सर्वांना द्यावे लागणार आहे. तसेच आधार क्रमांक नसल्यामुळे कोणाचेही रेशन कार्ड रद्द होणार नसल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT