Aadhaar for haircut service by appointment Tamil Nadu issues new rules 
देश

कटिंगच्या दुकानात आता लागणार आधारकार्ड; सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था

चेन्नई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये ०१ जूनपासून सलून आणि ब्युटी पार्लर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केस कापण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. तामिळनाडू सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तामिळनाडू सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार जर तुम्हाला केस कापून घ्यायचे असतील तर तुम्हाला आधार कार्ड दाखवावे लागेल. सलून मालक प्रत्येक ग्राहकाचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि आधार कार्ड नंबरची नोंद करेल. जर एखाद्या ग्राहकाने आधार कार्ड दाखविले नाही, तर त्याच्याविरूद्ध कारवाई केली जाणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. याचबरोबर, कोणतेही सलून ५० टक्के कर्मचारी असतील तरच उघडणार आहे. तसेच, सलूनमध्ये एसी लावण्यास परवानगी नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

भारत नक्कीच आत्मनिर्भर बनेल; हा आहे नवा फॉर्म्युला :  पंतप्रधान मोदी 

सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी मास्क लावणं बंधनकारक आहे. तसेच, ग्राहकांनी आधी हात स्वच्छ धुवावे लागतील. यानंतर त्यांना आरोग्य सेतु अॅपचा तपशील दाखवावा लागेल, असे काही नियम तामिळनाडू सरकारकडून सलून मालकांना लावण्यात आले आहेत. सलून मालक ग्राहकांना डिस्पोजेबल एप्रॉन आणि शूजसाठी कव्हर देतील. जर ग्राहकाचे बिल एक हजार रुपयांवर येणार असेल तर त्यांना डिस्पोजेबल एप्रॉन आणि फूट कव्हरसाठी 150 रुपये द्यावे लागतील असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, तामिळनाडू सरकारने आधी ग्रामीण भागातील सलून उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता संपूर्ण राज्यात सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सलून मालकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, सलून कर्मचाऱ्यांना सतत मास्क आणि स्वच्छता राखण्याचे आदेश दिले आहेत. तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही सलून उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. अशात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यास दमछाक होत असून त्यामुळे खर्चही वाढल्याचे कारण पुढे करत महाराष्ट्रातील सलून मालकांनी दाढी कटिंग सोबत अन्य दर वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT