aam aadmi party becomes national party in less than 10 years know rules for national party status 
देश

AAP : 'आप'ने करून दाखवलं! अवघ्या १० वर्षांत बनला 'राष्ट्रीय पक्ष'; जाणून घ्या काय आहेत नियम

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली महानगरपालिकेत भाजपची सत्ता उलथवून टाकणार आम आदमी पक्षा हा आता देशीतील आठवा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपला गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांत मात्र निराशा मिळाली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यादरम्यान 'आप' हा देशातील आठवा ‘राष्ट्रीय मान्यतेचा‘ पक्ष बनला आहे. खुद्द आरविंद केजरीवाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीमुळे आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. २०१३ मध्ये दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आप ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे १० वर्षांच्या आत पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे.

आपचे गोव्यात दोन आमदार तसेच दिल्ली पंजाब आणि दिल्ली महानगरपालिकेत सत्ता आहे. केजरीवाल यांच्या पक्षाला गोव्यात ६.७७ टक्के मते मिळाली होती. तर गुजरातमधील निवडणुकीत आम आदमी पक्षाला १३ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे आपला देशातील चार राज्यांमध्ये ६ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय म्हणून मान्यता मिळाली आहे.

हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

देशातील सध्याचे राष्ट्रीय पक्ष कोणते

देशात सध्या भाजप, काँग्रेस, बसपा, माकप, भाकप, राष्ट्रवादी आणि तृणमूल कॉंग्रेस आणि आप असे एकूण आठ राष्ट्रीय पक्ष आहेत. सध्या देशात राष्ट्रीय, राज्य आणि प्रादेशिक पक्ष अशी वर्गवारी आहे. देशात याआधी ७ राष्ट्रीय, ३५ राज्यस्तरीय पक्ष आणि ३५० प्रादेशिक पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला तीनपैकी एक अट पूर्ण करावी लागते.

राष्ट्रीय पक्ष होण्याच्या अटी

१. किमान तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीत संबंधित पक्षाने २ टक्के जागा जिंकल्या पाहिजेत.

२. लोकसभेच्या चार जागांच्या व्यतिरिक्त, पक्षाला लोकसभेत किमान ६ टक्के मते किंवा विधानसभा निवडणुकीत ४ टक्के किंवा अधिक राज्यांमध्ये ६ टक्के मते मिळाली पाहिजेत.

३. पक्षाला चार किंवा अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT