देश

Arvind Kejriwal Arrest : PM मोदींच्या इशाऱ्यावर केजरीवाल यांचा छळ; आपच्या खासदाराचा गंभीर आरोप

Arvind Kejriwal Arrest : गेल्या २१ मार्चपासून मुख्यमंत्री केजरीवाल दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मधुमेहाचे रुग्ण असून त्यांना इन्सुलिन घेण्यास तुरुंग प्रशासन अनुमती देत नाही. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आकसाचा व दुष्ट हेतू असल्याचा गंभीर आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

गेल्या २१ मार्चपासून मुख्यमंत्री केजरीवाल दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांना एखाद्या दहशतवाद्यासारखी वागणूक दिली असून त्यांना कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा भेटू दिले जात नाही. ते गेल्या ३० वर्षांपासून मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांना दररोज इन्सुलिन घ्यावे लागते. अन्यथा त्यांची प्रकृती ढासळू शकते. परंतु तुरुंग प्रशासन त्यांना इन्सुलिन सुद्धा घेऊ देत नाही. तुरुंग प्रशासनाला हे आदेश पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयातून येत असल्याचा आरोप खासदार सिंह यांनी केला. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला निवडणूक आयोगाचा दणका, प्रचारगीत नाकारलं; एका शब्दावर आक्षेप

Latest Marathi News Live Update : संभाजीनगर : प्रभाग १६ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न

Viral Video : माणुसकी आजही जिवंत आहे ! व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचंही हृदय भरुन येईल

Education System: भारतात सर्व शाळांमध्ये ऑस्ट्रेलिया पॅटर्न लागू होणार का? जाणून घ्या काय आहे हा पॅटर्न

‘कॉमन सेन्स नाही का?’सलमानसोबत काम करणारी अभिनेत्री डेजी शाहच्या शेजारच्या बिल्डिंगला आग, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT