arvind kejariwal
arvind kejariwal 
देश

उत्तराखंडच्या राजकारणात 'आप'ची एन्ट्री; केजरीवाल यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - आम आदमी पक्ष आता उत्तराखंडच्या राजकारणात उतरणार आहे. आज पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejariwal) यांनी उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. याबद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले की, पक्षाने नुकतंच डोंगराळ राज्य असलेल्या उत्तराखंडमध्ये सर्वेक्षण केले आहे. येथील बहुतांश भागातील लोकांची 'आप'ने उत्तराखंडमध्ये  निवडणुका लढवाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे.

केजरीवाल यांनी स्पष्टपणे जाहीर केले की आप आता आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, "उत्तराखंडमध्ये निवडणुका लढविण्याबाबत आम्ही सुरुवातीला साशंक होतो, यासाठीच आम्ही तिथे सर्वेक्षण केले. त्यात 62 टक्के लोकांनी आम्ही उत्तराखंडमध्ये निवडणुका लढवण्याच्या बाजूने कल दिला." सध्या आप पक्षविस्तारासाठी  उत्तराखंडमध्ये निवडणुका लढविणार असल्याचे दिसत आहे.

कॉंग्रेसबरोबर (Congress) युती करून सुमारे एक वर्ष सरकार बनवल्यानंतर आपने दिल्लीत सलग दोनदा मोठ्या फरकाने विजय मिळवून दिल्लीतील भाजपा आणि कॉंग्रेसचे खूप वाईट हाल केले होते. 'सध्या उत्तराखंडमध्ये बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्याबरोबरच पायाभूत सुविधाही मुख्य समस्या आहेत, हेच मुद्दे घेऊन आप आता  उत्तराखंडच्या राजकारणात वापरु शकते. तसेच आप उत्तराखंडमधील सर्व 70 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उत्तराखंडनंतर आम आदमी पार्टी पंजाब आणि गोव्यातही निवडणुका लढवणार असल्याचे सांगितलं जातंय.

दिल्लीचे उदाहरण देत केजरीवाल म्हणाले की, आपची दिल्लीत व्यवस्थित स्थापना झालेली नव्हती परंतु त्या स्थितीतही स्थापनेच्या दोन वर्षातच आम्ही कॉंग्रेस आणि भाजपला दिल्लीत मोठ्या फरकाने पराजित केले होते. देशाच्या इतर भागांप्रमाणेच उत्तराखंडमधील कॉंग्रेस आता संपली आहे.  मध्य प्रदेश आणि कर्नाटकसारख्या राज्यातील स्थिती पाहता लोक कॉंग्रेसला मतदान देणे शक्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT