AAP state president of Uttarakhand Deepak Bali has resigned esakal
देश

उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीला मोठा झटका; प्रदेशाध्यक्ष दीपक बालींचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय.

डेहराडून : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) मोठा धक्का बसलाय. उत्तराखंडचे अध्यक्ष दीपक बाली (Deepak Bali) यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. राजीनामा देताना बाली म्हणाले, 'मला आम आदमी पक्षाच्या कार्यपद्धतीसोबत जाण्यास अस्वस्थ वाटत आहे, त्यामुळंच मी हे पद सोडत आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारा.' दीपक बाली यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह उत्तराखंडचे प्रभारी दिनेश मोहनिया यांच्याकडं पाठवलाय.

दीपक बाली हे उत्तराखंडमधील रिअल इस्टेट (Real Estate) व्यावसायिक आहेत. त्यांनी 2020 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. बालींना पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीच सदस्यत्व दिलं होतं. यानंतर उत्तराखंडच्या राजकारणात बाली यांचा दर्जा वाढत गेला आणि काही महिन्यांनी ते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. यानंतर बालींना निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि त्यानंतर 2022 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly Election) त्यांना काशीपूरमधून पक्षानं उमेदवारी दिली. बालींना विजय मिळाला नसला, तरी तब्बल 16 हजार मतं मिळवून त्यांनी आपली ताकद दाखवून दिलीय.

अजय कोठियाल यांच्या जागी बालींची वर्णी

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करू न शकलेल्या आम आदमी पक्षानं काही महिन्यांपूर्वी अजय कोठियाल यांच्या जागी बाली यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्याचवेळी त्यांनी 2 जून रोजी राज्य कार्यकारिणी, सेल आणि सर्व जिल्हाप्रमुखांची घोषणा केली होती. दीपक बाली यांनी सर्व नवनियुक्त अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तुम्ही सर्वजण संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल, अशी आशा आहे. असंही म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT