देश

दाऊदचा साथीदार कुट्टीला झारखंडमधून अटक;तब्बल २४ वर्षांनी गुजरात पोलिसांना यश 

वृत्तसंस्था

जमशेदपूर, (झारखंड) - फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार, अब्दुल माजीद कुट्टी याला गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (‘एटीएस’) आज येथून अटक केली. माजीद हा सुमारे २४ वर्षांपासून फरार होता. 

‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुट्टी हा केरळचा रहिवासी आहे. तो १९९६ मध्ये १०६ पिस्तुले, ७५० काडतुसे आणि जवळपास चार किलो आरडीएक्स गोळा करण्याच्या गुन्ह्यात सहभागी होता. या गुन्ह्यात त्याच्या इतर साथीदारांना अटक झाली होती. मात्र कुट्टी फरार होता. तो झारखंडमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘एटीएस’च्या अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘राज्य गुप्तचर विभागाकडून कुट्टीच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शोधासाठी ‘एटीएस’चे पथक झारखंडला रवाना केले होते.’’ 

गुजरात आणि महाराष्ट्रात १९९७च्या प्रजासत्ताक दिली स्फोट घडवून आणण्याची दाऊद इब्राहिमची योजना होती. त्यासाठीच त्याने मोठ्या प्रमाणात ‘आरडीएक्स’ गोळा केले होते. मात्र त्याचा तो डाव उधळला गेला होता व त्यावेळी त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

कुट्टीचा आधी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे आणि नंतर त्याची चौकशी करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: गडकरी प्रमुख पाहुणे असताना स्टेजवर दोन महिला पोस्टमास्टरमध्ये धक्काबुक्की अन् शाब्दीक खटके; नेमकं काय घडलं?

१८०० कोटींचा जमीन घोटाळा, गुन्हा दाखल झालेले तिघे कोण? पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? वाचा A to Z

हिमालयातील जीवघेण्या थंडीत सैनिकांनी लढलेल्या युद्धाची शौर्यगाथा ; 120 बहादूरचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस !

'साताऱ्यात बांगलादेशींची घुसखोरी वाढली, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज'; भाजप नेते सोमय्यांनी असा का केला दावा?

Latest Marathi News Live Update : मुंबईत जलद लोकल सेवेवर परिणाम; मेल-एक्सप्रेस उशिरा, भायखळा सिग्नल बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT