ABG Shypyard
ABG Shypyard  Sakal
देश

ABG Shypyard : माजी संचालक ऋषी अग्रवाल चौकशीसाठी CBI मुख्यलयात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळा उघड झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या प्रकणाच्या चौकशीसाठी ABG शिपयार्डचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल आवश्यक कागदपत्रांसह केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मुख्यालयात दाखल झाले होते. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गेल्या आठवड्यातदेखील अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली आहे. (ABG Shipyard Case Former CMD Rishi Aggarwal Reaches CBI Headquarter)

नुकतेच सीबीआयने या प्रकरणातील आरोपी भारतात असल्याचे निवेदनात म्हटले होते. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 2019 मध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपीविरुद्ध एलओसी उघडल्याचे म्हटले होते. बँकांची २२,८४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने ABG शिपयार्ड लिमिटेड आणि तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण, ICICI-व्हिडिओकॉन प्रकरण, येस बँकेचे राणा कपूर प्रकरण इत्यादी प्रकरणे हातळलेले वकील विजय अग्रवाल यांच्यासमवेत अग्रवाल सीबीआय कार्यालयात दाखल झाले होते.

काय आहे ABG शिपयार्ड आणि कशी झाली फसवणूक

एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही एबीजी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे जहाजांची निर्मिती (Ship Manufacturing) आणि दुरुस्तीचे काम करते. ABG शिपयार्ड लिमिटेडची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली असून, आतापर्यंत या कंपनीने 165 हून अधिक जहाजांची निर्मिती केली आहे. मात्र, एकेकाळची भारतातील सर्वात मोठी खाजगी शिपयार्ड कंपनी आता कर्जबाजारी झाली आहे.

स्टेट बँकेने केलेल्या (SBI) तक्रारीनुसार, कंपनीने बँकेकडून 2,925 कोटी रुपये, आयसीआयसीआय (ICICI) बँकेकडून 7,089 कोटी रुपये, आयडीबीआय बँकेकडून 3,634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाकडून 1,614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून 1,244 कोटी रुपये, तर इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 1,228 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र, त्याचा वापर ज्या कारणासाठी दाखविण्यात आला होता तेथे खर्च न करता इतर ठिकाणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. या कंपनीला 28 बँका आणि वित्तीय संस्थांकडून क्रेडिट सुविधा मंजूर करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये SBI चे एक्सपोजर 2468.51 कोटी इतके होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT