ABG shipyard 
देश

ABG Shipyard : सीबीआयची संचालकांविरोधात लुकआउट नोटीस

28 बँकांना चुना लाऊन २२ हजार कोटींचा मोठा घोटाळा या कंपनीनं केल्याचं उघड झालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशातील २८ बँकांकडून सुमारे २२ हजार कोटींहून अधिक रक्कमेची कर्जे घेऊन त्याचा गैरवापर केल्याप्रकरणाची एबीजी शिपयार्ड (ABG Shipyard) या गुजरातमधील कंपनीविरोधात आता सीबीआयनं (CBI) कडक पावलं उचलली आहेत. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा मोठा खुलासा झाला होता, त्यामुळं आता सीबीआयनं एबीजी शिपयार्डचे संचालक आणि प्रमोटर्सविरोधात लुक आऊट नोटीस काढली आहे. हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा बँक घोटाळा आहे. (ABG Shipyard fraud case Look out notice issued against director Rishi Agarwal others)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एबीजी शिपयार्डचे संचालक आणि प्रमोटर्स असलेले ऋषी अग्रवाल, संथानम मुथास्वामी, अश्वनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल, रवि विमल नेवेटिया यांनी देश सोडून पळून जाऊ नये यासाठी सर्व सीमा अधिकाऱ्यांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयचे प्रवक्ते आरसी जोशी यांनी सांगितलं की, “आरोपी भारतात आहेत. सीबीआयनं आरोपींविरुद्ध लुक आऊट सर्क्युलर (एलओसी) आधीच काढले होते. यापूर्वी, स्टेट बँक ऑफ इंडियानं सन 2019 मध्ये मुख्य आरोपींविरुद्ध लूक आऊट नोटीसा काढल्या होत्या”

एबीजी शिपयार्ड, एकेकाळी भारतातील सर्वात मोठी खाजगी शिपयार्ड फर्म आहे. सीबीआयनं 28 बँकांची 22,800 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशातील आतापर्यंतचं हे सर्वात मोठं बँक फसवणूक प्रकरण आहे.

लूट आऊट नोटीस म्हणजे काय?

कोणत्याही आरोपीला देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली जाते. लुकआऊट नोटिसमध्ये, तपास एजन्सी आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकारी, बंदरांचे अधिकारी आणि इतर देशांच्या सीमेवरील रस्त्यांवरील सुरक्षा दलांना आरोपींनी देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT