Mamata Banerjee  esakal
देश

Mamata Banerjee : ''वय झालेल्यांनी बाजूला व्हावं'', अभिषेक बॅनर्जींच्या विधानामुळे बंगालमध्ये काकी-पुतण्या वाद पेटणार?

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या तृणमूल काँग्रेसमध्ये ज्येष्ठ विरुद्ध तरुण नेते असा संघर्ष उफाळून आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोलकताः आतापर्यंत ममता बॅनर्जी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या तृणमूल काँग्रेसमध्ये ज्येष्ठ विरुद्ध तरुण नेते असा संघर्ष उफाळून आला आहे. खुद्द ममतांनी ज्येष्ठ नेत्यांना पाठिंबा दिला असला तरीसुद्धा त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे मात्र तरुण रक्ताला संधी द्यावी, या मताचे आहेत. खुद्द ममतादीदींनी मागील महिन्यामध्येच तरुणांनी ज्येष्ठांचा आदर ठेवायला हवा, असे मत मांडले होते. ममतांच्या या सूचनेनंतर हा वाद आणखीनच तीव्र झाल्याचे बोलले जाते.

‘राजकारणामधून निवृत्तीसाठी विशिष्ट वयोमर्यादा असावी,’ असा आग्रह अभिषेक बॅनर्जी यांनी धरला आहे. ‘वयोमानानुसार व्यक्तीची काम करण्याची क्षमता कमी होत असते, त्यामुळे अशा स्थितीमध्ये तिने थांबणेच योग्य ठरते,’ असे स्पष्ट मत अभिषेक बॅनर्जी यांनी मांडले आहे. अभिषेक यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी पक्षामध्ये तरुण विरुद्ध ज्येष्ठ नेते असा कोणताही संघर्ष नसल्याचे म्हटले असले तरीसुद्धा ज्येष्ठांना कोठे थांबायचे? हे कळायला हवे, असे नमूद केले. तरुण पिढीला जागा करून देण्यासाठी ज्येष्ठांनी दूर व्हायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जीच सर्वेसर्वा

तरुण विरुद्ध ज्येष्ठ हा वादच मुळात बालिशपणा असल्याचे मत सुदीप बंदोपाध्याय यांनी मांडले. पक्षाला ज्येष्ठ आणि तरुण अशा दोन्ही प्रकारचे नेतृत्व लागते, असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सौगत रॉय यांनी मात्र राजकारणात वय ही मर्यादा असू शकत नाही असे स्पष्ट मत मांडले. शेवटी नेत्यांबाबत निर्णय घेण्याचे काम हे ममता बॅनर्जी याच करतील, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

त्यांना फटका बसणार

अभिषेक बॅनर्जी यांचा प्रस्ताव प्रत्यक्षात लागू झाल्यास याचा सर्वांत मोठा फटका हा सुदीप बंदोपाध्याय आणि सौगत राय यांनाच बसणार असल्याने त्यांनी याला विरोध केल्याचे बोलले जाते. ममतांचे निकटवर्तीय फिरहाद हकीम यांनी केवळ दीदीच एखाद्या नेत्याचे कमाल निवृत्ती वय ठरवू शकतात, असे नमूद केले

अनेक मंत्री ज्येष्ठ

तृणमूल काँग्रेसमधील अनेक खासदार आणि राज्यातील मंत्र्यांचे वय हे सत्तरच्या वर असून ज्येष्ठ मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खात्यांचा कारभार सोपविण्यात आला आहे. यातील अनेक नेत्यांनी घोष यांच्या वक्तव्याला विरोध दर्शविला आहे. अभिषेक यांचा प्रस्ताव ममतांकरवीच फेटाळून लावण्याचे नियोजन ज्येष्ठांनी आखल्याचे कळते.

एक व्यक्ती, एक पद फॉर्म्युला

अभिषेक बॅनर्जी यांच्या तालमीत तयार झालेले अनेक तरुण तुर्क हे नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी सज्ज झाले असून ‘एक व्यक्ती, एक पद’ हा फॉर्म्युला सर्वत्र लागू करण्यात यावा असा या नेत्यांचा आग्रह आहे. अशाच प्रकारचा वाद २०२२ मध्ये उद्‍भवला तेव्हा ममतादीदींनीच पुढाकार घेत सर्व समित्या बरखास्त केल्या होत्या तसेच काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT