देश

अपघातात लातूर, नांदेड, सातारा जिल्ह्यातील सहाजण ठार 

सकाळवृत्तसेवा

मांजरी - विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्‍यातील होनगळहळ्ळीजवळ मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ट्रक व मोटार यांच्यात अपघात झाला. या अपघातात पाचजण जागीच ठार झाले तर मेहबूब नसीर सय्यद याचा शहराजवळील भगवती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातात सहाजण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. 

अपघातात ठार झालेले महाराष्ट्रातील नांदेड येथील राज इनफोटक्‍चर डेव्हलपमेंट कंपनीचे कर्मचारी आहेत. विजापूर-हुबळी रस्ता कामावरील कंत्राटदार कर्मचारी होते. ते सर्व कर्मचारी जिल्ह्यातील बसवण बागेवाडी तालुक्‍यातील कोल्हार येथे शेडमध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी त्यांचे रस्ता कामासंबंधातील मशीन बिघडलेले होते. त्याची दुरुस्तीसाठी विजापूर येथून कर्मचारी आले होते. त्यांना व इतर कर्मचाऱ्यांना जेवण आणण्यासाठी वाहनाने (एमएच 12, क्‍यूजी 4766) जात असताना बागलकोटहून विजापूरकडे येत असलेल्या ट्रकची (केए 28, सी 1134) त्यांच्या मोटारीस समोरासमोर धडक बसली. 

यात विकास विलास सूर्यवंशी (रा. चरेगाव, जि. सातारा), मुस्ताक इसाक मुगरोळ (रा. गुंडोपंत, जि. नांदेड), गजानन पीराज डोणे (रा. भोसे, जि. हिंगोली), तौशीक सय्यद (रा. मुंगरोळ रोड, जि. लातूर), अब्बास अब्दुल पटेल (रा. मुगरोळ, जि. लातूर), मेहबूब नुरसाब सय्यद (रा. सोनवाला, जि. लातूर) हे ठार झाले. मुनीर अब्बास सय्यद (रा. सोनावाला, जि. लातूर) हा गंभीर जखमी झाला असून त्यास विजापूर सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे. या अपघातातील ट्रक चालक व किनर फरारी असून या अपघाताची नोंद बबलेश्वर पोलीस ठाण्यात केली आहे. 

आठ दिवसांपूर्वी साखरपुडा 
या अपघातात मृत पावलेला युवक मेहबूब नुरसाब सय्यद यांचा आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. पैसे कमवून विवाह करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मेहबूबचे स्वप्न या अपघातामुळे अधुरेच राहिले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT