Narendra Modi सकाळ डिजिटल टीम
देश

वा मोदीजी वा.. लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा अव्वल!

विशेष म्हणजे यूएस, ऑस्ट्रेलिया, जपानच्या नेत्यांनाही मोदींनी मागे सोडले.

सकाळ डिजिटल टीम

मॉर्निंग कन्सल्ट यूएस-आधारित ग्लोबल लीडर अप्रूवल ट्रॅकरनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ७७ टक्क्याच्या रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. विशेष म्हणजे यूएस, ऑस्ट्रेलिया, जपानच्या नेत्यांनाही मोदींनी मागे सोडले. १८ मार्च रोजी, मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने १३ देशांतील नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेटिंग सर्वोच्च असल्याचे सांगितले. (According to a US-based global leader approval tracker Morning Consult, Prime Minister Narendra Modi remains the world’s most popular leader with an approval rating of 77%.)

या सर्वेक्षणात जगातील १३ लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ७७ टक्क्यासह अव्वल स्थानावर आहेत. यात उल्लेखनीय म्हणजे मोदींना सर्वात कमी नापसंती रेटिंग १७ टक्के आहे.यावरुन हे निदर्शनास येते की जानेवारी २०२० ते मार्च २०२२ मोदी सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेते राहिले. ही रेटिंग ९ ते १५ मार्च २०२२ पर्यंत गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरीसन यांना ४१ टक्के रेटिंग आहे तर जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा यांना ४२ टक्के रेटींग आहे. जागतिक युद्धासारखी परिस्थिती असताना, जगातील मोठे नेते 40 ते 42 टक्क्यांच्या मान्यता रेटिंगवर अडकले आहेत. तर 77% सह मोदींना जगातील पहिली पसंती मिळाल्याने ही खुप मोठी बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT