Crime News esakal
देश

प्रेमास नकार देणार्‍या युवतीवर अ‍ॅसिड हल्‍ला; गळा, पाठीवर झाल्या गंभीर जखमा

सकाळ डिजिटल टीम

अ‍ॅसिड हल्‍ला केल्यानंतर संशयित नागेश फरारी झाला आहे.

बंगळुरु (कर्नाटक) : सध्या देशभरात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीय. त्यातच आता प्रेमास (Love) नकार देणार्‍या युवतीवर अ‍ॅसिड हल्‍ला (Acid Attack) करण्यात आलाय. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याची घटना येथील सुंकदकट्टी बस स्थानकानजीक (Sunkadakatte Bus Stand) गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडलीय.

दरम्यान, अ‍ॅसिड हल्‍ला केल्यानंतर संशयित नागेश (वय 27) फरारी झाला आहे. या घटनेत युवतीचा गळा, पाठ आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. ती सुमारे 50 टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित युवती एम. कॉम. झाली असून नऊ महिन्यांपूर्वी ती येथील एका खासगी कंपनीत नोकरीला लागली होती. याआधी ती नागेशसोबत दुसर्‍या कंपनीत काम करत होती. तिथे त्यांचे प्रेम जुळले होते. त्यानंतर त्यांच्यात अचानक फूट पडली. त्यानंतर तो तिला धमकावत होता, अशी माहिती समजते. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! आता पीक विम्याचे पैसे किती मिळणार? रक्कम कशी ठरणार, पाहा संपूर्ण गणित

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT