acid attack threat acid attack threat
देश

मुलीच्या साक्षगंधात प्रियकराचा गोंधळ; माझ्याशी लग्न कर अन्यथा...

सकाळ डिजिटल टीम

एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. ही घटना ताजी असतानाच एकतर्फी प्रेमातूनच ‘तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझा चेहरा ॲसिड (acid attack threat) जाळून टाकेन’ अशी धमकी मुलीला देण्यात आली. तसेच तरुणीचे साक्षगंध तोडण्यासाठी तरुणाने चांगलाच गोंधळ घातला. आकाश श्रीवास असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील खंडवा येथे घडला.

प्राप्त माहितीनुसार, आकाश श्रीवास (रा. खंडवा, गणेश तलाई) हा नेहमी मुलीच्या घरी येत होता. परंतु, तो प्रेम करीत असल्याचे मुलीला माहीत नव्हते. अशात मुलीचे साक्षगंध ठरले. ती इंदूरला साक्षगंधासाठी गेली होती. आकाश तिथे पोहोचला. त्याने लग्न मोडण्यासाठी मुलीच्या होणाऱ्या पतीला फोन केला व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणी आणि तिच्या होणाऱ्या पतीला मारहाण केली.

या सर्व प्रकारानंतर मुलगी खंडवा येथील आपल्या घरी परत येण्यासाठी निघाली. यावेळी तरुणाने तिला वाटेत अडवून चेहरा ॲसिडने जाळण्याची धमकी दिली. ‘माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझा चेहरा (acid attack threat) जाळून टाकेन. मग तुझ्याशी कोणीही लग्न करणार नाही’ असे म्हटले. यामुळे घाबरलेल्या मुलीने खंडवा येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुलीच्या तक्रारीवरून आकाशला इंदूर पोलिसांनी अटक (accused arrested) करून तुरुंगात टाकले. कोतवाली पोलिसात आरोपी आकाशविरुद्ध विनयभंग, ठार मारण्याची धमकी देणे यासह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT