Mahatma Phule Jan Arogya Yojana in Belgaum Karnataka Police
Mahatma Phule Jan Arogya Yojana in Belgaum Karnataka Police esakal
देश

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या चार केंद्रांना ठोकले टाळे; प्रशासनाची धडक कारवाई, मराठी भाषिकांत संताप

सकाळ डिजिटल टीम

योजनेची अंमलबजावणी सुरू होताच कन्नड संघटनांनी जिल्हा प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरूवात केली. या योजनेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून चार केंद्रांची स्थापना केली होती.

बेळगाव : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या (Mahatma Phule Jan Arogya Yojana) अंमलबजावणीसाठी सुरू करण्यात आलेल्या चार केंद्रांना अखेर शनिवारी (ता. १३) प्रशासनाकडून टाळे ठोकण्यात आले. रामलिंगखिंड गल्लीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) कार्यालयात केंद्र नसतानाही कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले, त्यामुळे समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलिस खाते व सामान्य सेवा केंद्राच्या वतीने संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई झाली. दरम्यान, जन आरोग्य योजनेसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रांना शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली होती. शनिवारीही त्या केंद्राना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती डॉ. डूमगोळ यानी ‘सकाळ’ला दिली.

या सेवा केंद्रांच्या माध्यमातून किती अर्ज वितरित करण्यात आले, किती अर्ज दाखल करून घेण्यात आले. याची माहिती सादर करण्याची सूचना नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आल्याचेही डॉ. डूमगोळ यांनी सांगितले. प्रशासनाच्या या कारवाईचे पडसाद सीमाभागात व महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. शहरातील शिवाजीनगर, रामलिंग खिंड गल्ली, गोवावेस व शहापूर येथील विठ्ठलदेव गल्लीतील केंद्रांना टाळे ठोकले.

शनिवारी शासकीय सुटी असतानाही प्रशासनाने कारवाई केली आहे. शिवाय या केंद्रांच्या माध्यमातून कोणते व्यवहार झाले आहेत, याची माहिती घेण्याचा प्रयत्नही प्रशासनाकडून सुरू झाला आहे. या कारवाईच्या माध्यमातून प्रशासनाने कारवाईचा कळस गाठल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. टाळे ठोकल्याची ही कारवाई किती दिवस अमलात राहणार प्रशासनाकडून तेथील टाळे काढले जाणार की नाही? महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सीमाभागातील नागरिकांना दिला जाणार की नाही? असे प्रश्‍नही या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना सीमाभागातील ८६५ गावांना लागू केल्यापासूनच येथील कन्नड संघटनाना पोटशूळ उठला होता. योजनेची अंमलबजावणी सुरू होताच कन्नड संघटनांनी जिल्हा प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरूवात केली. या योजनेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून चार केंद्रांची स्थापना केली होती. त्या केंद्रांना नोटीस बजावण्याचा निर्णय गुरुवारी (ता. ११) जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी जाहीर केला होता.

शिवाय ही जन आरोग्य योजना बेळगावातील ज्या दोन हॉस्‍पिटल्समध्ये उपलब्ध आहे, त्या हॉस्पिटल्सना नोटीस बजावण्याचा निर्णयही जाहीर केला होता. या निर्णयावर सीमाभागातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय मानवतेच्या विरोधात असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त झाले.

म. ए. समिती काय निर्णय घेणार?

येथील रामलिंगखिंड गल्लीतील रंगूबाई पॅलेस येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यालय आहे. या कार्यालयाला शनिवारी टाळे ठोकले. हे कार्यालय म्हणजे सीमाभागातील मराठी भाषिकांचा मानबिंदू आहे. तेथे टाळे ठोकून प्रशासनाने मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्याच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तेथे जन आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू नव्हते, तरीही तेथे टाळे ठोकले; पण प्रशासनाने सत्य लपविण्याचा प्रयत्न केला. कारवाईविरोधात आता म. ए. समिती कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

SCROLL FOR NEXT