Kangana Ranaut,Shankaracharya  eSakal
देश

Kangana Ranaut: जेव्हा राजा प्रजेचं शोषण करतो, तेव्हा…; कंगनाने शंकराचार्यांना शिकवला राजधर्म

Kangana Ranaut on Shankaracharya avimukteshwaranand remark: राजकारण्यांनी राजकारण करायचं नाही तर का मग पाणीपुरी विकायची का? असा थेट सवाल तिने शं‍कराचार्यांना विचारला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राजकीय भूमिका घेणाऱ्या शं‍कराचाऱ्यांना अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत हिने चांगलंच झापलं आहे. राजकारणामध्ये आघाडी, युती, पक्षाचे विभाजन अशा घटना होणे सामान्य आणि संविधानिक आहे. हे सर्व राजकारणाचा एक भाग आहे. राजकारण्यांनी राजकारण करायचं नाही तर का मग पाणीपुरी विकायची का? असा थेट सवाल तिने शं‍कराचार्यांना विचारला आहे.

ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवाय, त्यांचे तौंडभरून कौतुक केले होते. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला. हिंदू धर्मामध्ये विश्वासघात हा सर्वात मोठा गुन्हा आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना विरोधकांकडून टीकेचा सामना करावा लागत आहे.

कंगना रनौत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बचावासाठी पुढे आली आहे. ती म्हणाली की, 'अविमुक्तेश्वरानंद यांनी शिंदेंना देशद्रोही आणि विश्वासघातकी म्हणून सगळ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. राजकारणात हे सर्व होत असतं. काँग्रेस पक्ष देखील १९०७ आणि १९७१ मध्ये फुटला होता.'

कंगना रनौत पुढे म्हणाली की, शंकराचार्यांनी त्यांचा प्रभाव आणि धार्मिक शिक्षेचा दुरुपयोग केला आहे. धर्म असंही सांगतो की, जर राजा प्रजेचं शोषण करत असेल तर राजद्रोह हाच मोठा धर्म आहे. शं‍कराचार्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत चुकीच्या शब्दाचा वापर केला. त्यांना गद्दार, विश्वासघाती असं म्हणण्यात आलं. अशा प्रकारची छोटी गोष्ट करून ते हिंदू धर्माच्या सन्मानाला हाणी पोहोचवत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ज्योतिर्मठचे शंकराचार्य राजकीय भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी मागे काँग्रेस नेते राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाचे समर्थन केले होते. राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचा अपमान केला नाही. जे अर्धवट माहिती देऊन खोटं पसरवत आहेत, त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असं ते म्हणाले होते. त्यांनी त्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरेंचे आदरातीथ्य स्वीकारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT