

Pune Mumbai expressway traffic experience
esakal
Maharashtra expressway traffic chaos : कोल्हापूरहून मुंबईसाठी रात्री ‘आराम’ बसमधून सुरू झालेला प्रवास पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे अक्षरशः थांबून गेला. बस दर दोन तासांत अवघे शंभर मीटर पुढे सरकत असून, प्रवासी तब्बल १७ तासांपासून बसमध्ये अडकून पडले आहेत. एकच वडा-पाव वाटून खाल्ला, पोलिसांनी दिलेल्या एकाच पाण्याच्या बाटलीवर प्रवासी तहान भागवत आहे. बसमधील वयोवृद्ध, महिला व लहान मुलांना होणारा त्रास पाहवत नाही, असा अनुभव वाहतूक कोंडीत अडकलेल्या बसमधील प्रवासी बशीर नाईकवडी (रा. इंगळी, ता. हातकणंगले) यांनी‘सकाळ’शी बोलताना सांगितला.