ADG S Paramesh Indian Coast Guard esakal
देश

Indian Coast Guard : एस परमेश यांची भारतीय तटरक्षक दलात अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती

एडीजी एस परमेश यांना तटरक्षक दलातील विशिष्ट सेवेबद्दल मिळालं राष्ट्रपतींकडून तटरक्षक पदक

सकाळ डिजिटल टीम

एडीजी एस परमेश यांनी गेल्या तीन दशकांमध्ये किनाऱ्यावर आणि समुद्रात तैनातीद्वारे विविध क्षमतांमध्ये संस्थेची सेवा केली आहे.

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाचे एडीजी एस परमेश (ADG S Paramesh) यांची नवी दिल्लीतील मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते विशाखापट्टणम (Vishakhapatnam) इथं तटरक्षक दलाचे कमांडर म्हणून कार्यरत होते.

सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी विशाखापट्टणम इथं पदभार स्वीकारला होता. Eastern Seaboard ची कमान हाती घेण्यापूर्वी परमेश हे तटरक्षक क्षेत्र (पूर्व) आणि तटरक्षक दल (पश्चिम) च्या प्रमुखपदी तैनात होते. नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्ली आणि डिफेन्स सर्व्हिसेस कॉलेज, वेलिंग्टनचे कॅडेट एडीजी परमेश यांच्याकडं अनेक कामगिरी आहे.

एडीजी एस परमेश यांनी गेल्या तीन दशकांमध्ये किनाऱ्यावर आणि समुद्रात तैनातीद्वारे विविध क्षमतांमध्ये संस्थेची सेवा केली आहे. ते फ्लॅग ऑफिसर ऑपरेशन्स नेव्हिगेशन आणि डायरेक्शनमध्ये तज्ञ आहेत. एडीजी एस परमेश यांना तटरक्षक दलातील विशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींकडून तटरक्षक पदक मिळालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या ‘E-kyc’ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ? उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत; 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ‘ई-केवायसी’

Liquid Gold For Winters: हिवाळ्यात राहाल निरोगी, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

SCROLL FOR NEXT