देश

काँग्रेस नेते म्हणतात, 'गांधी कुटुंब हा ब्रँड '

पीटीआय

कोलकता : गांधी-नेहरू कुटुंब हा "ब्रॅंड' असल्याने त्याबाहेरील व्यक्तीला कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करणे अत्यंत अवघड जाऊ शकते, असे मत कॉंग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी व्यक्त केले आहे. 

"पीटीआय'शी बोलताना चौधरी म्हणाले की, गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पक्ष चालविणे अवघड जाऊ शकते. राजकारणातही "ब्रॅंड' असतो. सध्याची भाजपची परिस्थिती पाहता, मोदी-शहा यांच्याव्यतिरिक्त भाजप इतके यश मिळवू शकतो काय? त्यामुळे आमच्या पक्षातही गांधी कुटुंब अपरिहार्य आहे. त्यांच्याइतके वलय आमच्या कोणत्याच नेत्याकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. देश सध्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात अडकला असून, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी निश्‍चित विचारधारा आणि देशभर संपर्काचे जाळे असलेला कॉंग्रेसच योग्य पक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला. कोणतीही विचारधारा नसलेले प्रादेशिक पक्ष कमकुवत होण्यावरच कॉंग्रेस पुन्हा प्रबळ होणे अवलंबून असल्याची कबुलीही त्यांनी या वेळी दिली. 

सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी नेतृत्व देण्याच्या निर्णयाचे अधीररंजन चौधरी यांनी समर्थन केले. "सोनिया यांनी आधीही कॉंग्रेसला अडचणीतून बाहेर काढले आहे. या वेळी त्या नेतृत्व स्वीकारण्यास तयार नव्हत्या. मात्र, पक्षाची अडचण आणि ज्येष्ठ नेत्यांची विनवणी मान्य करून त्यांनी हे पद स्वीकारले आहे,' असे चौधरी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT