Adity Birla Grop's Electorol Bonds To BJP Esakal
देश

Electoral Bonds: आदित्य बिर्ला समूहाने भाजपला 100 कोटींची देणगी दिल अन् दोन महिन्यांतच...

Aditya Birla Group: सर्व राजकीय पक्षांना एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यान जवळपास 556 कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या आदित्य बिर्ला समूहाने, यापैकी 285 कोटी रुपये भाजपला दिले आहेत.

आशुतोष मसगौंडे

Adity Birla Grop's Electorol Bonds To BJP:

भारतात सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच टेलिकॉम कंपन्या राहिल्या आहेत. यामध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनंतर भारतातील तिसरी मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया ही आहे.

या कंपनीची मालकी सध्या ब्रिटिश कंपनी व्होडाफोन पीएलसी आणि भारतीय आदित्य बिर्ला समूहाच्या संयुक्त मालकीची आहे. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून ही कंपनी विविध संकटांना तोंड देत आहे. याचे मुख्य कारण कर्ज आहे. या कंपनीकडे बँका, वित्तीय संस्था आणि केंद्र सरकारचे मिळून 2.14 लाख कोटी रुपये कर्ज आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये, नरेंद्र मोदी सरकारने एक मदत पॅकेज जाहीर केले ज्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील संघर्ष करणाऱ्या व्होडाफोन-आयडिया कंपनीला त्यांच्या सरकारी कर्जाचा काही भाग सरकारच्या इक्विटीमध्ये रूपांतरित करता आला.

जानेवारी 2022 मध्ये, Vi ने इक्विटीमध्ये रूपांतरणाचा पर्याय निवडला. तथापि, जसजसे वर्ष सरत गेले आणि त्याचे नुकसान वाढत गेले, तसे कंपनीने 6 डिसेंबर रोजी जाहीर केले की त्यांनी याबद्दल सरकारकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.

द स्क्रोल या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या इलेक्टोरल बाँड डेटावरून असे दिसून आले आहे की, संकटाच्या घोषणेच्या सहा दिवसांनंतर, आदित्य बिर्ला समूहाच्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोख्यांमध्ये 100 कोटी रुपयांची देणगी दिली होती.

फेब्रुवारी 2023 मध्ये, देणगीच्या दोन महिन्यांत, मोदी सरकारने 16,000 कोटी रुपयांच्या कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतर केले, ज्यामुळे भारत सरकार Vi मधील सर्वात मोठे भागधारक बनले.

दरम्यान, अदित्य बिर्ला समूहाच्या बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, उत्कल अल्युमिना इंटरनॅशनल लिमिटेड आणि ABNL इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या तीन कंपन्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले होते.

सर्व राजकीय पक्षांना एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यान जवळपास 556 कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या आदित्य बिर्ला समूहाने, यापैकी 285 कोटी रुपये भाजपला दिले आहेत.

अदित्य बिर्ला समूहाने ओडिशात सत्तेत असलेल्या बिजू जनता दलाला 264.5 कोटी रुपयांची देणगी देखील दिली आहे, जिथे बिर्ला समूहाचे खाण, धातू आणि रासायनिक उद्योगांमध्ये हितसंबंध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT