देश

फुटीरतावाद्यांना सरकारचा दणका; सुरक्षेसोबत सुविधाही काढून घेतल्या

वृत्तसंस्था

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने प्रथम पाकिस्तानला आणि आता काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना दणका दिला आहे. मोदी सरकारने काश्मीरमधील सर्व फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यात हुरियत कॉन्फरन्सचा नेता मीरवाईज उमर फारुक, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोन, हाशिम कुरैशी, शब्बीर शाह शामिल याचा समावेश आहे.

सरकारने दिलेल्या आदेशानुसार, फुटीरतावाद्यांना देण्यात आलेली सुरक्षा आणि गाड्या आजपासून काढून घेण्यात येत आहेत. या नेत्यांना सुरक्षा जवानांकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जाणार नाही. तसेच सरकारकडून त्यांना अन्य काही सुविधा दिल्या असतील तर त्या तात्काळ मागे घेतल्या जातील. केंद्र सरकारच नाही तर राज्य सरकारकडून फुटीरतावादी नेत्यांना पोलिस सुरक्षा अथवा अन्य काही सुविधा दिल्या असतील तर त्या देखील मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुलवामामध्ये गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सुरु आहे. देशातील नागरिकांच्या या मागणीनंतर मोदी सरकारने देखील कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT