high court Permission  sakal
देश

भेसळयुक्त दूध विकल्याप्रकरणी जन्मठेपेसह 20 हजाराचा दंड

सुनावणीदरम्यान चार साक्षीदारांची साक्ष सरकारी वकिलामार्फत घेण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

दुधाची (Milk) भेसळ करणाऱ्या एका व्यक्तीस न्यायालयाने (Court) वीस हजार रुपयांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महाराजगंज जिल्ह्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी हा निकाल दिला आहे. तब्बल तेवीस वर्षांपूर्वी दाखल झालेल्या या खटल्याचा निकाल काल (ता.९) लागला.अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा सिंह यांनी आरोपी गोरक्षकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दुधात भेसळ आढळून आल्यानंतर खजुरिया येथील राम साजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. २३ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. सुनावणी दरम्यान पुराव्यासह चार साक्षीदारांची साक्ष सरकारी वकिलामार्फत घेण्यात आली. त्यावर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेसह २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सहायक सरकारी अधिवक्ता सर्वेश्वर मणी त्रिपाठी यांनी सांगितले की, १७ मे १९९९ रोजी तत्कालीन अन्न निरीक्षक एम.एल. गुप्ता यांनी महाराजगंजच्या ऑफिसर कॉलनी गेटजवळून तीन गोठ्यातील दुधाचे नमुने तपासले होते. यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता. सुनावणीदरम्यान पुराव्यासह चार साक्षीदारांची साक्ष सरकारी वकिलामार्फत घेण्यात आली.यावळी योग्य पुरावा हाती लागताच शिक्षा सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: खिशात फक्त 20 रुपये घेऊन अमेरिकेत पोहोचले, आज अब्जावधींचे मालक! भारतीय उद्योजकाचा डंका

Khambatki Ghat Tunnel Route : सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा! खंबाटकी घाटात 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली

Latest Marathi News Live Update : मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे व्यसन जडल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

SCROLL FOR NEXT