amarjit.
amarjit. 
देश

'मोदींनी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला'; आंदोलनाच्या ठिकाणी वकीलाची आत्महत्या!

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात आंदोलनात सामिल झालेले पंजाबचे अधिवक्ता अमरजीत सिंह (Advocate Amarjit singh commit suicide) यांनी आत्महत्या केली आहे. अमरजीत पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्याच्या जलालाबाद बार असोसिएशनचे (Bar association) अधिवक्ता होते. टिकरी बॉर्डरवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) बीबी गुलाब कौर स्टेजजवळ त्यांनी आपला जीव दिला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सौरव 'दादा' राजकारणात एन्ट्री करणार ? बंगालच्या राज्यपालांशी केली एक...

पोलिसांचे म्हणणं आहे की, टिकरी बॉर्डरपासून काही किलोमीटर अंतरावर अमरजीत यांनी कथितरित्या विष पिऊन आत्महत्या केली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सुसाईड नोटमध्ये अमरजीत सिंह यांनी लिहिलंय की शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि कृषी कायद्यांच्या विरोधात ते आपला जीव देत आहेत, जेणेकरुन सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करेल.

पोलिसांनी सांगितलंय की 18 डिसेंबरला सापडलेल्या सूसाईड नोटच्या खरेपणाचा तपास सुरु आहे. हरियाणातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, अमरजीत यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली असून ते आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. याशिवाय अन्य दोन आत्महत्यांमध्ये शेतकरी आंदोलनाशी संबंध लावण्यात आला आहे. 65 वर्षाचे शिख प्रचारक संत राम सिंग यांनी सिंधू बॉर्डरवर कथितरित्या आत्महत्या केली होती. 

'मित्रपक्षांची फसवणूक ठीक नाही'; नवा अध्यक्ष नियुक्त करताच जेडीयूचा...

पोलिसांनी अमरजीत यांची चिठ्ठी मिळाल्याचा दावा केला आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात म्हणण्यात आलंय की, जनतेने पूर्ण बहुमताने आणि पूर्ण शक्तीने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. सामान्य जनतेला आपल्याकडून चांगल्या भविष्याची आशा होती. पण, मोठ्या दु:खाने म्हणावं लागतंय की, तुम्ही काही उद्योगपतींचे पंतप्रधान बनून राहिला आहात. नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी स्वत:ला असुरक्षित वाटून घेत आहेत. हजारो लोक आपल्या कुटुंबासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण, तुम्ही भांडवलदाराचे खिसे भरण्याचं काम करत आहात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT