कपिल सिब्बल सध्या सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल तलाक आणि हलालाच्या प्रकरणी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या बाजूने केस लढत आहेत. या सुनावणीदरम्यान त्यांनी केलेल्या युक्तिवादामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कपिल सिब्बल हे वकिली पेशात जेवढे मुरलेले आहेत, तेवढीच इतर क्षेत्रांमध्येही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. जाणून घेऊ त्यांच्या कारकिर्दीविषयी... (Kapil Sibbal Political and Personal life)
कपिल सिब्बल यांचे वडीलही वकीलच होते. त्याचबरोबर त्यांची दोन्ही मुलंही वकील आहेत. कपिल सिब्बल यांनी १९७३ मध्ये UPSC परीक्षा पास झाले होते. मात्र त्यांना वकिली क्षेत्रात यायचं असल्यानं त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला नाही. कपिल सिब्बल फक्त राजकारण किंवा वकिलीतच नव्हे, तर साहित्य क्षेत्रातही योगदान दिलेलं आहे. २००८ मध्ये कपिल सिब्बल यांचा I withness: partial observations हा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. या कविता अटल बिहारी वाजपेयींनाही आवडल्या होत्या, ते अनेकदा या कविता ऐकत आणि ऐकवत असत. तर २०१२ मध्ये My world within हा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला होता. (Kapil Sibbal as poet)
याशिवाय गीतकार म्हणूनही सिब्बल यांनी काम केलेलं आहे. २०१६मध्ये आलेला चित्रपट शोरगुल यातली तेरे बिना आणि मस्त हवा ही दोन गाणी सिब्बल यांनी लिहिलेली आहेत. याशिवाय ए.आऱ. रहमान यांच्या रौनक अल्बमसाठीही गाणी लिहिली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.