Hema Malini file
देश

"अयोध्या, काशीनंतर आता मथुराही महत्त्वाची"; हेमा मालिनींकडून भव्य कृष्ण मंदिराची मागणी

मथुरेची खासदार असल्याने इथंही कृष्णाचं भव्य मंदिर असावं, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

स्वाती वेमूल

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी मथुरेतही (Mathura) भव्य मंदिर होईल, अशी आशा व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचा उल्लेख केला. रविवारी इंदूरमध्ये त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. रामजन्मभूमी आणि काशीच्या पुनरुज्जीवनानंतर मथुराही खूप महत्त्वाची आहे, असं त्या म्हणाल्या. हेमा मालिनी या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इंदूरला गेल्या होत्या. सोमवारी काशीला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

काय म्हणाल्या हेमा मालिनी?

"प्रेम आणि आपुलकीचं प्रतीक असलेल्या भगवान कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेची खासदार म्हणून मी म्हणेन की तिथे भव्य मंदिर असावं. तिथे मंदिर आहेच आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी विकसित केलेल्या काशी-विश्वनाथ कॉरिडॉरसारखं नवीन स्वरुप दिलं जाऊ शकतं आणि त्या मंदिरातून थेट गंगा नदी दिसू शकेल" असं त्या म्हणाल्या. पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "अयोध्या आणि काशीनंतर आता मथुराही खूप महत्त्वाची आहे. त्याचंही काम व्हायला हवं. जे अजून झालेलं नाही. मथुरेची खासदार असल्याने मला असं म्हणायचं आहे की इथंही कृष्णाचं भव्य मंदिर असावं. काशी-विश्वनाथचं पुनरुज्जीवन आणि पुनर्विकास करणं खूप कठीण होतं. पण त्यातून मोदींची दूरदृष्टी दिसून येते. मथुरेतही तसं होऊ शकेल."

याआधी केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बल्यान यांनीसुद्धा भव्य कृष्ण मंदिराची मागणी केली होती. "अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधलं जात असताना कृष्णाचं जन्मस्थान असलेल्या मथुरेतही काहीतरी भव्य बांधलं जावं", असं ते म्हणाले होते.

उत्तर प्रदेशातील मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, असं मानलं जातं. ज्याठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्याठिकाणी केशव देव मंदिर बांधण्यात आलं आहे. इथं जन्माष्टमी दरवर्षी भव्य पद्धतीने साजरी केली जाते. अजमेर, पुरी, वाराणसी, वेल्लोर, द्वारका आणि गया यांसारख्या हेरिटेज शहरांसह केंद्र सरकारने राष्ट्रीय हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजनेसाठी (HRIDAY) मथुरेचाही समावेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT