ED attaches NCP leader Praful Patel property located in Worli
ED attaches NCP leader Praful Patel property located in Worli  
देश

NCP Prafulla Patel: प्रफुल्ल पटेलांचं प्रमोशन! राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षपदी निवडीनंतर म्हणाले, भविष्यासाठीचं नेतृत्व...

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : शरद पवारांच्या मनात जी खळबळ सुरु होती त्याला त्यांनी अखेर आज वाट करुन दिली आहे. त्यानुसार त्यांनी आजच्या राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापनदिनी दिल्लीतून मोठी घोषणा केली. यामध्ये पक्षाचे दोन कार्यकारी अध्यक्ष घोषित केले.

यामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, उपाध्यक्षपदावरुन कार्याध्यक्षपदी प्रमोशन झाल्यानंतर पटेलांनी आनंद व्यक्त केला आहे. (after being elected as working president of NCP Prafulla Patel gives first reaction)

कार्याध्यक्षपदी निवडीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर या निवडीचा आनंद दिसत होता. यावर पटेल म्हणाले, "सुरुवातीपासून मी राष्ट्रीय पातळीवर काम करत आलो आहे.

माझ्यासाठी ही पदोन्नती म्हणा किंवा आणखी काही. पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट नाही. कारण मी पहिल्यापासून राष्ट्रवादीची जबाबदारी सांभाळत आलो आहे. माझ्यासाठी कुठलीही जबाबदारी शरद पवारांनी दिली ती मी पार पाडणार, आजपर्यंत ती पार पाडत आलो यापुढेही पार पाडणार आहे"

दरम्यान, राष्ट्रवादीच्या भविष्यासाठी एक नवीन नेतृत्व तयार करावं ही शरद पवारांची मानसिकता असावी, यासाठी त्यांनी ही तरतूद केली असावी. माझी कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचं मला सकाळी आल्यानंतरच समजलं. मला याची आधी कल्पना नव्हती. मागच्या अधिवेशनात माझ्यावर आधीच उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, असंही यावेळी पटेल म्हणाले.

पहिलं प्राधान्य कशाला?

राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देणं हे आमचं पहिलं काम असेल. नागालँडमध्ये आम्हाला ओळख मिळाली तशाप्रकारे दोन तीन राज्यात मतांची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करु, असा पहिला अजेंडा राष्ट्रवादीच्या नव्या कार्याध्यक्षांनी सांगितला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांच कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

व्हिडिओ एडिटर कसा बनला केजरीवालांचा PA? स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमारांना समन्स

Sunil Chhetri Net Worth: ऑडी, फॉर्च्युनर सारख्या कारचा मालक, बेंगळुरूमध्ये आलिशान घर; फुटबॉलपटू सुनील छेत्रीची संपत्ती किती?

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT