Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi : काँग्रेसचं ठरलं! 'भारत जोड़ो'नंतर आता आणखी एका नव्या यात्रेची तयारी सुरू

सकाळ डिजिटल टीम

रायपूर : 'भारत जोडो यात्रे'नंतर आता काँग्रेस देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागापर्यंत यात्रा काढण्याचा विचार करत आहे, जी अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदर दरम्यान होण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेसकडून संकेत देण्यात आले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची तपश्चर्या पुढे नेण्यासाठी कार्यक्रम तयार करावा, ज्यात सहभागी होण्यासाठी सर्वजण तयार आहेत. राहुल यांनी आपल्या प्रवासाला अनेक प्रसंगी तपश्चर्या असे नाव दिले आहे.

ही यात्रा पासीघाट येथून सुरू होऊन पोरबंदर येथे संपण्याची शक्यता आहे. त्याबद्दल प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवासाचे स्वरूप दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवासापेक्षा वेगळे आहे. येत्या काही आठवड्यांत सर्व काही अंतिम होईल, असं काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाले.

ईशान्येकडील भौगोलिक आणि हवामानाची परिस्थिती पाहता यात्रेसाठी वाहतुकीच्या विविध साधनांचा (मल्टिमोडल) वापर केला जाऊ शकतो, पण मुळात ही पदयात्रा असेल. जयराम रमेश म्हणाले की, यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रवाशांची संख्या 'भारत जोडो यात्रे'पेक्षा कमी असू शकते. गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये झाला होता. यात राहुल गांधींसह सुमारे २०० सदस्य सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Rashid Khan: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर रशीद खानचा तीव्र संताप; म्हणाला, 'रमजानच्या पवित्र महिन्यात ही क्रूरता...'

IPL Kisse: वानखेडेवर शाहरुखचा संताप! विलासराव देशमुखांचा एक निर्णय अन् 5 वर्षांची बंदी, 2012 मधील IPL सामन्यात काय घडलं होतं?

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT