Punjab CM Charanjit Singh Channi
Punjab CM Charanjit Singh Channi Google
देश

Punjab Election : काँग्रेसनंतर आता भाजपचीही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (CM Charanjeet Singh Channi) यांनी नुकतंच निवडणूक आयोगाला (Election Commission of India) पत्र लिहून पंजाबच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज भाजपनंही (BJP) निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. १६ फेब्रुवारी रोजी संत रविदास (Sant Ravidas) जयंती आहे, या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे. (after Congress now BJP also demands postponement of Punjab Assembly elections)

निवडणूक आयोगानं नुकत्याच जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. याची मतमोजणी १० मार्च रोजी असेल. मात्र, मतदानाच्या दोन दिवसांनंतर १६ फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती आहे. यासाठी पंजाबमधील सुमारे २० लाख रविदास अनुयायी दरवर्षी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जात असतात. त्यांच्यासाठी १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी हा जयंती उत्सवाचा काळ असतो. या काळात पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं तात्पुरतं स्थलांतर होत असतं.

या पार्श्वभूमीवर, मागासवर्गीय समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्याकडे निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगानं आपण पत्र लिहित असून कमीत कमी सहा दिवस निवडणूक पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती मुख्यमंत्री चन्नी यांनी शनिवारी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली होती. मुख्यमंत्री चन्नी यांच्या पत्राला निवडणूक आयोगानं अद्याप उत्तर दिलेलं नाही. त्यातच याच कारणासाठी आता भाजपनेही निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडं केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT