Prayagraj Buldoser action 
देश

प्रयागराज हिंसाचार : आरोपीच्या घरावर चालवला बुलडोझर!

दिल्लीतील जहांगिरपुरीतील कारवाईनंतर आता प्रयागराजमध्ये केली कारवाई

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीच्या जहांगिरपुरी इथं हिंसाचारातील आरोपींची घर बुलडोझरनं पाडल्यानंतर आता अशीच कारवाई उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं करण्यात आली आहे. प्रयागराज इथल्या अटाला इथं शुक्रवारी नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती त्यानंतर हिंसाचाराच्या घटनाही घडल्या होत्या. या हिंसाचारातील आरोपी मोहम्मद जावेद ऊर्फ जावेद पंप हाच मास्टरमाईंड असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (After Delhi Now bulldozer driven on Prayagraj violence accused house)

प्रयागराज विकास प्राधिकारणानं (पीडीए) नोटीस जाहीर करत १२ जून रोजी सकाळी ११ वाजता घर खाली करण्याची नोटीस जावेद पंपच्या घरावर चिटकवली होती. पण सकाळी वेळेआधीच प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली. यावेळी पंपचे कुटुंबीय घरातच होते. जावेदचं घर बेकायदा बांधल्याचं या नोटीस म्हटलं आहे.

दरम्यान, अटाला हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी पाच डझनावरुन अधिक आरोपींची यादी तयार केली असून यांच्या अटकेसह इतर कारवायांचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळं जिल्हा प्रशासन, प्रयागराज विकास प्राधिकरणाची टीम शनिवारी दिवसभर अटाला आणि इतर भागात आरोपींच्या घरांची नोंदणी करत होते.

अटाला हिंसाचाराच्या मास्टरमाईंडला अटक, ६८ जण ताब्यात

अटाला इथं शुक्रवारी नमाजनंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचाराचा मास्टरमाईंड जावेद पंपला पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला करेली येथील घरातून पकडण्यात आलं. त्याचबरोबर याप्रकरणी रात्रभर सुरु असलेल्या कोंबिग ऑपरेशनदरम्यान ३२ इतर आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. शनिवारी उशीरापर्यंत ६८ जणांना ताब्यात घेण्यात आलं. व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT