after facebook live murder and suicide in one family at uttar pradesh
after facebook live murder and suicide in one family at uttar pradesh 
देश

फेसबुक लाईव्ह करून पत्नीवर झाडली गोळी अन्...

वृत्तसंस्था

अलीगड (उत्तर प्रदेश): फेसबुक लाईव्ह करून एकाने आत्महत्या करत असल्याचे सांगून पत्नीवर गोळी झाडली. त्यानंतर स्वताःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघांचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याच्या भावानेही आत्महत्या केल्याची घटना येथे घडली असून, खळबळ उडाली आहे.

अलिगड येथील बन्नादेवी परिसरात ही घटना घडली असून, यामध्ये शैलेंद्र, त्याची पत्नी पिंकी आणि भाऊ विशालचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच कुटुंबातील इतर सदस्य आणि स्थानिकांची गर्दी केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.  शैलेंद्रने 2 वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या पिंकीसोबत प्रेमविवाह केला होता. विवाह झाल्यापासून त्यांच्या कुटुंबामध्ये वाद सुरू होता. याच वादातून शैलेंद्रने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:देखील गोळ्या जाडून आत्महत्या केली. दोघांचा मृत्यू झाल्याचे पाहून विशालने सुद्धा गोळी झाडून आत्महत्या केली.

शैलेंद्रने फेसबुक लाईव्ह केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, 'मी आत्महत्या करतोय आणि मी मनापासून करतोय. मी जे काही करतोय ते ठीक आहे कारण मी आहे मी घरातल्यांमुळे अस्वस्थ आहे. आता मी असं आयुष्य जगू शकत नाही, असे म्हणत असतानाच त्याने पत्नीवर गोळी झाडली. संबंधित घटना फेसबुकवर गेली होती. यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळ्यांचा आवाज ऐकताच शैलेंद्रचा भाऊ धावत खोलीत आला आणि त्याने भावाचा आणि वहिणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. यानंतर त्यानेही तिथेच पडलेल्या बंदूकीने स्वत:वर गोळ्या झाडल्या. यात शैलेंद्रच्या भावाचाही मृत्यू झाला.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT