Harsh Vardhan-Ramdev Baba
Harsh Vardhan-Ramdev Baba File photo
देश

आरोग्यमंत्र्यांनी खडसावल्यानंतर रामदेवबाबांचा माफीनामा

वृत्तसंस्था

सोशल मीडियामध्ये रामदेवबाबांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीविरोधात बोलताना दिसले.

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. त्यावरून बराच गोंधळ उडाला होता. इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक होत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दबाव वाढू लागल्याने आरोग्यमंत्र्यांनी रामदेव बाबा यांना आपलं वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं आहे. (After HM Harsh Vardhan's letter Baba Ramdev apologizes for remarks allopathy medicines)

आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर रामदेवबाबा यांनी पत्र लिहून आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअॅपवर आलेले फॉरवर्ड मेसेज वाचून मी अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असं म्हणालो होतो, हे विधान मागे घेत आहे, असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे. आम्ही आधुनिक चिकित्सा विज्ञानमध्ये अॅलोपॅथीचे विरोधी नाही आहोत. माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.

डॉ. हर्ष वर्धन यांनी रामदेवबाबांना पाठवलेले पत्र आपल्या ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध केले होते. संपूर्ण देशवासियांसाठी डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. रामदेवबाबांच्या वक्तव्यामुळे कोरोना योद्ध्यांचा अपमान झाला असून देशातील नागरिकांच्या भावनांना ठेस पोहोचली आहे. मी त्यांना त्यांचे वादग्रस्त वक्तव्य मागे घेण्यास सांगत आहे, असं डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर देताना रामदेवबाबा म्हणाले की, डॉ. हर्ष वर्धन तुमचे पत्र मिळाले. चिकित्सा पद्धतीबाबतच्या विवादास खेदपूर्वक विराम देऊन मी माझे वक्तव्य मागे घेतो आणि हे पत्र मी तुम्हाला पाठवत आहे.

दरम्यान, सोशल मीडियामध्ये रामदेवबाबांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीविरोधात बोलताना दिसले. कोरोना महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमागे अ‍ॅलोपॅथीचं कारण सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत, असं ते म्हणाले होते.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT