Income Tax Raid: लखनऊ आणि मऊ मधील सपा नेत्यांवर केलेली आयकर विभागाची कारवाई (Income Tax Raid) ही मतदानाअगोदर जाणूनबुजून केलेली कारवाई आहे, असे समाजवादी पार्टीचे (Samajvadi Party) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी म्हटले आहे.
भाजप (BJP) सरकार काम करताना भेदभाव करते. या सरकारने जनतेला त्रास दिला आहे. परंतु आता जनतेने भाजपला संपवायचा निर्णय घेतला आहे.https://www.esakal.com/desh/akhilesh-yadav-jayant-chaudhary-tweet-pics-after-meeting-hint-at-poll-alliance-vsh97 (Rajiv Ray) समाजवादी पक्षासाठी दिवसरात्र काम करत असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय महासचिव राजीव राय यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राजीव राय यांनी म्हटले होते की, हा आयकर विभाग आहे. माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभुमी नाही. मी लोकांना मदत करतो, हे सरकारला आवडलं नाही. त्यामुळेच त्यांनी हा छापा मारला आहे. आता एफआयआर करतील. विनाकारण केस लढायला लावतील. परंतु ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.