Vaishno Devi assembly seat Jammu Kashmir assembly  
देश

Jammu Kashmir Election : अयोध्या-बद्रीनाथ हारले, वैष्णोदेवी तरी जिंकणार का? PM मोदींसह भाजपची प्रतिष्ठा पणाला

Vaishno Devi assembly seat Jammu Kashmir assembly Politics : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी २६ जागांवर ५६ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे

रोहित कणसे

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी २६ जागांवर ५६ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या उत्सहाने लोकांनी रांगा लावून मतदान केल्याचे पाहायला मिळाले.

या मतदान प्रक्रियेदरम्यान सर्वाधीक मतदान झाले ते हॉट सीट्सपैकी एक वैष्णो देवी या जागेवर. येथे तब्बल ७९.९५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जम्मू काश्मिरमध्ये मतदारसंघाच्या फेररचनेनंतर ही नवीन जागा आस्तित्वात आली आङे. भाजपने या जागा जिंकण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील येथील कटरा येथे प्रचारासाठी पोहचले होते. भाजपकडून येथील उमेदवाराला विजयी करण्यासाठी खूप जोर लावला जात आहे, जेणेकरून अयोध्या तसेच बद्रीनाथ या मतदारसंघांप्रमाणे येथे पराभव पत्करावा लागू नये.

१९ सप्टेंबर रोजी पीएम मोदींनी कटरा येथे तब्बल दोन किमी लांबीचा रोड शो केला. पंतप्रधान मोदी यांचे वैष्णो देवी मंदिरावरील आस्था सर्वपरिचीत आहे. २०१४ मध्ये जेव्हा भाजपने त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते तेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुक अभियानाची सुरुवात करण्याआधी या मंदिरात प्रार्थना केली होती.

२०२२ मध्ये मतदारसंघाच्या फेररचनेनंतर आता श्री माता वैष्णो देवी विधानसभा मतदारसंघ हा रियासी आणि उधमपूर विधासभा मतदारसंघापासून वेगळा झाला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या फैजाबाद (आयोध्या) या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता, त्यानंतर विधानसभा पोटनिवडणुकीत उत्तराखंड येथील बद्रीनाथ मतदारसंघात देखील पराभवच पदरी पडाला. या दोन्ही जागांवर झालेल्या पराभवानंचर विरोधकांनी भाजपवर खूप टीका केली. त्यामुळे आथा वैष्णो देवी मतदारसंघात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे येथे भाजप संपूर्ण ताकतीने प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT