rape case  file photo
देश

बंगालमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालमधील नादिया येथील सामूहिक बलात्कारानंतर आता बीरभूम जिल्ह्यात अल्पवयीन आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेला बोलपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनिकेतन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोपई नदीच्या काठावर असलेल्या आदिसावी समाजातील एका अल्पवयीन मुलीवर तीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही.

ही तरुणी कोपई नदीच्या काठावर एका स्थानिक तरुणासोबत बसली असताना सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक तरुण हा तिचा प्रियकर होता. तीन मुलांनी हा गुन्हा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या आठवडाभरातील बलात्काराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, नादिया जिल्ह्यात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्याचा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता.

आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बीरभूम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नागेंद्र नाथ त्रिपाठी म्हणाले, "ज्यावेळी हा गुन्हा घडला तेव्हा मुलगी आणि तिचा प्रियकर नदीच्या काठावर बसले होते. तीन जणांनी हा गुन्हा केल्याचे युवकाने सांगितले. आम्हाला लेखी तक्रार मिळाली असून चौकशी सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी शुक्रवारी दुपारपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. त्याचबरोबर नादिया सामूहिक बलात्कार प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचा तपास सुरू झाला आहे. या घटनेनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्थापन केलेल्या फॅक्ट फाइंडिंग टीमने शुक्रवारी सकाळी नादिया जिल्ह्याला भेट दिली आणि पीडित कुटुंबाची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: करुणा अन् धनंजय मुंडे यांच्यात न्यायालय करणार मध्यस्थी; म्हणाल्या, ''पुन्हा भेट नको..''

Theur Accident : थेऊरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ९ दुचाकींचा चक्काचूर; चालकावर गुन्हा दाखल!

Unique Amla Candy Recipe: हटके पद्धतीने बनवा इम्युनिटी वाढवणारी आवळा कँडी; आजच ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी!

Solapur Election : तीन उमेदवारांच्या अर्जावरील आपिलाचा निकाल कायम; न्यायालयाने निर्णय अधिकाऱ्यांना दिला पाठिंबा!

Latest Marathi News Live Update: पुण्यात विवाहित महिलेने ९व्या मजल्यावरुन उडी मारुन दिला जीव

SCROLL FOR NEXT