After two and a half hours of discussion candidate list has been not announced
After two and a half hours of discussion candidate list has been not announced 
देश

Vidhan Sabha 2019 : अडीच तासांच्या चर्चेनंतरही भाजपच्या तिकीटवाटपाचा घोळ कायम?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्यासाठी भाजप निवडणूक समितीची बैठक आज रात्री साडेदहाच्या सुमारास संपली. मात्र पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थित अडीच तास खलबते होऊनही आज यादी जाहीर करण्यास भाजपला संपूर्ण अपयश आले. शिवसेनेबरोबर युतीत होणाऱ्या चर्चेत अखेरच्या क्षणी अनपेक्षित विघ्न आल्याने भाजप आज रात्री यादी जाहीर करू शकला नाही अशी चर्चा दिल्लीत आहे. आता उद्या (ता. 30) मुंबईत गरवारे क्रीडागारात होणाऱ्या यादी जाहीर करतील असे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणूक समितीच्या बैठका झाल्या. हरियाणाचे बैठक रात्री दहाच्या सुमारास संपली व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर निघून गेले. मात्र महाराष्ट्राचे घोंगडे भिजत पडले असून केवळ महाराष्ट्रमुळे भाजपच्या दोन्ही याद्या आज जाहीर होऊ शकलेल्या नाहीत असे समजते. आजच्या मुख्य चर्चेनंतर महाराष्ट्राच्या नेत्यांना पुन्हा चर्चा करण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर देखील भाजपचा तिढा काही सुटेना तेव्हा रात्री अकराच्या सुमाराला यादी जाहीर करणार नाही असे संकेत देण्यात आले.

आजच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे हे राज्याचे मंत्री उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद; महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT