up wedding  esakal
देश

Crime News : धक्कादायक! लग्नानंतर वधूने दिला अवघ्या दहा दिवसात बाळाला जन्म, पतिने स्वीकारण्यास दिला नकार अन्...

कानपूर मध्ये भोगनीपूर कोतवाली भागातील नवविवाहित वधूने बाळाला जन्म दिल्याने सासरच्या मंडळीनी वधूला स्वीकारण्यास दिला नकार

सकाळ वृत्तसेवा

उत्तर प्रदेश मधील कानपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसात नवविवाहित वधूने बाळाला जन्म दिला. कोतवाली भागातील एका दलित मुलीचे लग्न भोगनीपुर परिसरात राहणाऱ्या एका मुलासोबत 15 मे 2023 रोजी झाले. त्यानंतर ती माहेरी आली होती.

पंचवीस मे रोजी तिच्या पोटात दुखू लागले व तिला प्रसव वेदना सुरू झाल्या 26 मे रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. ही घटना तिच्या सासरी समजल्या नंतर त्यांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला. दुसरीकडे पीडीतेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गॅंगरेप आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात गावातील अरुण पाल आणि विनय पाल यांच्या विरोधात बळजबरीने बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असे रुरा पोलीस ठाणे निरीक्षक समर बहादुर सिंग यांनी सांगितले.

आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. जन्माला आलेली मुलगी अशक्त असल्यामुळे अल्पवधीतच तिचा मृत्यू झाला. पीडीतेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.या प्रकरणी अरुण पाल आणि विनय पाल यांच्या विरोधात 374- डी 506 आणि 3(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सिंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार; पण कोणत्या आणि सुविधा काय असणार? जाणून घ्या...

T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार; सूर्यकुमार यादवची टीम बघा कोणत्या तारखेला शेजाऱ्यांना परत हरवणार

सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि दाढी... राजकुमार रावला नक्की काय झालय? Viral Video

Latest Marathi News Update : 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट,तक्रारदार संदीप पाटील यांचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Horscope : उद्या 17 फेब्रुवारी! मंगळ देवाच्या कृपेने 3 राशींचे नशीब बदलणार; लगेच सुरू होतोय धनयोग, आरोग्याची मोठी समस्या संपणार

SCROLL FOR NEXT