Agricultural expert Dr Ani S Das collapses and dies on doordarshan Live TV Show marathi news 
देश

Agricultural Expert Death : दूरदर्शनच्या लाइव्ह टीव्ही शोमध्ये बेशुद्ध पडले अन्... कृषी तज्ञाचा दुर्देवी मृत्यू

केरळच्या दूरदर्शन चॅनलवर सुरु असलेल्या लाइव्ह शो दरम्यान, एक कृषी तज्ञ अचानक बेशुद्ध पडले आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

रोहित कणसे

Dr Ani S Das Death on Live TV: केरळच्या दूरदर्शन चॅनलवर सुरु असलेल्या लाइव्ह शो दरम्यान, एक कृषी तज्ञ अचानक बेशुद्ध पडले आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळ कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. अनी एस दास (५९ वर्षे) यांनी एका कार्यक्रमाच्या लाइव्ह चर्चेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जिथे प्रश्नोत्तरादम्यान ते अचानक बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. (Agricultural expert Dr Ani S Das collapses and dies on doordarshan Live TV Show)

शुक्रवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास अनी एस दास बेशुद्ध झाल्याची घटना घडली. कृषी तज्ज्ञ डॉ. अनि एस दास यांनी कृषी दर्शन कार्यक्रमाला सहभागी झाले होते. लाइव्ह कार्यक्रम सुरू असताना ते अचानक गप्प झाले आणि बसलेल्या खुर्चीवर मागे झुकले. लाइव्ह सुरु असलेली चर्चा तात्काळ थांबवण्यात आलेीआणि त्यांना तातडीने वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र त्यांचया मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

डॉ. अनी एस दास हे कोल्लम जिल्ह्यातील रहिवासी होते आणि ते केरळच्या कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते. यासह, ते लाइव्हस्टॉक अँड अॅग्रीकल्चर सर्व्हिसेसचे एक्झीक्यूटीव्ह डायरेक्टर (KLDB) होते. डॉ. अनी एस दास यांनी यापूर्वी देखील अनेकदा दूरदर्शनवरील शेतीशी संबंधित कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT