2002 Godhra Train Coach Burning Case esakal
देश

Gujarat : गोध्रा हत्याकांडातील आरोपीला 20 वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणी न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.

2002 Godhra Train Coach Burning Case : 2002 च्या गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणी गोध्रा न्यायालयानं (Godhra Court) एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. या घटनेत 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता.

गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयानं शनिवारी आरोपी रफिक भाटुक (Accused Rafiq Bhatuk) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. भाटुकला फेब्रुवारी 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी अटक झाल्यानंतर या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खटला सुरू झाला.

भाटुक आतापर्यंतचा 35 वा आरोपी

27 फेब्रुवारी 2022 रोजी अयोध्येहून कारसेवकांना घेऊन परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याच्या प्रकरणात भाटुकचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या घटनेत 59 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं जातीय दंगलीही उसळल्या. यामध्ये 1200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. विशेष सरकारी वकील आर. सी. कोडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाटुक हा या प्रकरणातील आतापर्यंतचा 35 वा आरोपी असून, त्याच्यावर न्यायालयात गुन्हा सिद्ध झालाय.

11 जणांना फाशी, 20 जणांना जन्मठेप

गेल्या वर्षी पंचमहाल पोलिसांनी विशेष कारवाई करून गोध्रा शहरातील एका भागातून भाटुकला ताब्यात घेतलं होतं. आरोप सिद्ध झाल्यानंतर तो फरार झाला होता, त्या काळात तो अनेक शहरांमध्ये राहत होता. विशेष एसआयटी न्यायालयानं यापूर्वी 1 मार्च 2011 रोजी या प्रकरणात 31 जणांना दोषी ठरवलं होतं, त्यापैकी 11 जणांना फाशीची तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT